Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १० ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
कुरखळी रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे पहिल्याच पावसात मुख्यमंत्री सडक योजनेचे तीन तेरा
कुरखळी रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे पहिल्याच पावसात मुख्यमंत्री सडक योजनेचे तीन तेरा
कुरखळी प्रतिनिधी (योगेश्वर मोरे )
शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथील घटना यातीलच एक. तालुक्यात शासनाच्या चालढकल व हेंडसाड वृत्तीच्या
कार्यप्रणालीला ग्रामस्थांनी कडाडुन विरोध केला, शिंगावे ते जातोडा रस्त्यासाठी युवकांसोबत गावकऱ्यांनी अवयव विक्रीला परवानगी द्या अन्यथा रस्ता बांधून द्या असा पवित्रा घेतला होता, तर कुरखळीत युवकांकडून थेट मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला होता. या व इतर घटनांचा विचार करून आगामी ग्रामपंचायत व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
रस्त्याच्या कामांना मान्यता देऊन टेंडर पद्धतीने कंत्राटदाराला काम देण्यात आले. परंतु पहिल्याच पावसात रस्ता खचल्याची परिस्थिती दृश्य दिसत आहेत, ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशीच काहीशी परिस्थिती शिरपूर तालुक्यात घडल्याची चित्रे दिसत आहेत.
कुरखळी गावाचा रस्ता हा देखील मुख्यमंत्री सडक योजनेत कुरखळी - पिंप्री ते थाळनेर रस्त्यापर्यंत ७. २०० किमी इतका मंजूर झाला आहे. अंदाजित ३१७. ३५ लक्ष रुपये यासाठी मंजूर झाले आहेत. या कामावर नियंत्रण ठेवणेकामी शासनाकडून कार्यकारी अभियंता - प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते व विकास संस्था, धुळे ही संस्था काम पाहते.
रस्त्याला अडचण ठरणाऱ्या पाण्याला वेगळा मार्ग मिळून देण्यासाठी मोऱ्या बांधण्यात आल्या आहेत. मोऱ्यांच्या दोन्ही बाजूस रस्त्याला ठिकठिकाणी तडा गेला असून, खडी काम उखळलेले दिसत आहे. रस्ता दुर्घटनेत अनेकदा जिवित हानी सोबत वाहनांचे तसेच प्रवासींचे देखील आर्थिक नुकसान झाल्याचे दिसत व ऐकत असतो. भविष्यात कुरखळी रस्त्यावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन काय पाऊल उचलले या कडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.
यांच्यामते
श्री. पाटील - स्थापत्य अभियंता, धुळे
यासर्व परिस्थितीची पूर्व कल्पना कंत्राटदाराने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिली नसल्याचे स्पष्ट झाले. स्थापत्य अभियंता श्री पाटील यांच्याशी संपर्क केला असता, त्यांना सदरील घटनेबाबत कंत्राटदाराने कळविले नसल्याचे समजले. तर श्री पाटील यांनी सोमवारी कंत्राटदारा सोबत प्रत्यक्ष येऊन घटनास्थळी भेट देण्याची कबुली दिली. व सदरील परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
तद्नंतर अवघ्या ३ तासात पाटील यांनी तत्परता दाखवत स्वःता ला पारिवारिक अडचणीमुळे येन शक्य न झाल्यामुळे त्यांनी आपले अधिनस्त सहाय्यक अभियंता आशिष पाटील यांना प्रत्यक्षस्थळी पाहणी कामी पाठविले असता कामाची सद्यस्थिती जाणून घेतली.
योगेश्वर मोरे - प्रमुख - कुरखळी सर्वांगीण विकास मंच
रस्ता कामाच्या तपशिलात कंत्राटदाराला करावयाच्या पहिल्या थरासाठी ३०३०२. ३२ घ मी मातीकाम करणे अपेक्षित होते. ते मातीकाम सुरुवातीस झाले नसल्याचे दिसून येते. आधीच्या रस्त्यावरील डांबरीकरण उकरून त्यावरच खडी व मुरुमाने भराव केल्याचे दिसत आहे. याचसोबत पहिल्याच पावसात निकृष्ठपणे केलेल्या कामाचा दर्जा उघळ होऊन पोलखोल झालेली येथे दिसत आहे.
ग्रामस्थ कुरखळी - रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी व दोषींवर कायदेशीर कार्यवाही व्हावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा