Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९

प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शिरपूर तहसीलदार यांना निवेदनाद्वारे आज दि १३ रोजी देण्यात आले.



प्रतिनिधी:गणेश वाडीले  शिरपूर तालुक्यात नुकसानग्रस्त घरांचे व शेती पिकांंचे पंचनामे करण्याचे आदेश नसल्याचे बेजबाबदारपणे बोलणारे मंडळाधिकारी व क्रुषी साहाय्यक अधिकारी यांच्यावर कारवाई करून त्वरित पंचनामे करावे अन्यथा बेजबाबदारपणे बोलणारे अधिकारींंच्या तोंडाला काळे फासण्यात येणार असल्याबाबतचा ईशारा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शिरपूर तहसीलदार यांना निवेदनाद्वारे आज दि १३ रोजी देण्यात आले.

निवेदनात म्हटल्यानुसार शिरपूर तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसापुर्वी प्रचंड मोठ्याप्रमाणात पाऊसाने हजेरी लावली होती.यामुळे तालुक्यातील नदी नाल्यांना पुर आला होता.यात अनेकांचे घरे उध्वस्त झाले आहेत.तर अनेकांचे पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एखदा मोठे संकटापुढे जावे लागत आहे.अनेक शेतकऱ्यांनी पिकांचे पंचनामे व्हावेत यासाठी मंडळाधिकारी, क्रुषी साहाय्यक यांना संपर्क साधला असता मंडळाधिकारी व क्रुषी साहाय्यक अधिकारी यांनी 

शेतकऱ्यांना अत्यंत बेजबाबदारपणाने उत्तर दिले आहेत.यात अधिकारींंचे म्हणने असे आहे की,आम्हाला पंचनामा करण्याचा आदेश अद्याप प्राप्त झालेला नाही.त्यामुळे आम्ही पंचनामे करू शकत नाही.अशा बेजबाबदार पणे बोलणार्या अधिकारींंवर तात्काळ कारवाई करा अन्यथा ८ दिवसात मंडळाधिकारी व क्रुषी साहाय्यक अधिकारी यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल.त्यामुळे पाऊसात झालेल्या 

नुकसानीचे पंचनामा करण्याचे तहसीलदार यांनी त्वरित आदेश द्यावे असा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे ईश्वर बोरसे,मनोज राजपूत, डॉ गणेश वाडीले,महेंद्र 

पाटील,विजय कोळी,नितीन जाधव,दिपक पावरा,भैय्या सोनवणे,मुकेश गिरासे,रोहित कोळी,प्रमोद पाटील,रोहित ईशी,नितीन धनगर आदी जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध