Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९

भविष्यात आडगावसह तालुक्यात पाणी आडवा पाणी जिरवा साठी मोठं काम करणार--आडगावात जल पूजन प्रसंगी घनश्याम अग्रवाल यांचे प्रतिपादन




चोपडा(प्रतिनिधी) विनोद निकम
गावाचा लोकसहभाग असल्याशिवाय सामाजिक काम करण्यात कुठेही मजा येत नाही, गाव करी ते राव काय करी, गावाची एकजूट पाहून मला खूप आनंद वाटला म्हणूनच आमच्या मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मेहनत घेऊन या ठिकाणी खोलीकरणाचे काम करण्याचा निर्णय घेतला होता.आज या 

खोलीकरणाच्या कामात पाणी अडकल्याने मला जलपूजन करताना खूप आनंद होत आहे, पुढच्या पिढीला आपल्याला वाळवंटात घेऊन जायचं नसेल तर आजच्या पिढीने पाणी आडवा पाणी जिरवा चे काम केली पाहिजे. यासाठी मी सदैव चोवीस तास सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहील तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी आडवा पाणी जिरवा काम आगामी वर्षात मित्र मंडळाच्या वतीने करणार असून आडगावला त्यात कायम प्रथम प्राधान्य देऊ असे प्रतिपादन आज आडगावात जलपूजन प्रसंगी भाजप नेते घनश्याम अग्रवाल यांनी केले आहे. 

आडगाव ता. चोपडा याठिकाणी जलक्रांती ग्रुप व लोकसहभागातून करण्यात आलेल्या तसेच घनश्याम अग्रवाल यांनी केलेला आर्थिक सहकार्यामुळे खोलीकरण काम करण्यात आले होते, या खोली करणाच्या कामात या चार-पाच दिवसात झालेल्या पावसामुळे त्या ठिकाणी जवळपास पाच कोटी लिटर पाणी असल्याने याठिकाणी आज जलपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

 भाजप नेते घनश्याम अग्रवाल यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले तर  तहसिलदार अनिल गावीत व पंकज समूहाचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. 

यावेळी गावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब पाटील,पंचायत समितीचे माजी सभापती प्रा भरत जाधव, माजी सरपंच पंडित पाटील,

अंबादास पाटील, माजी उपसरपंच योगराज जाधव, दामोधर पाटील,शिवाजी पाटील, मधुकर पाटील, गोपाल पाटील, ललित पाटील, गजानन पाटील,आर डी पाटील,नरेंद्र पाटील,श्याम माळी,एस के पाटील,विजय पाटील,प्रदीप पाटील,डॉ प्रशांत पाटील,कैलास पाटील,वसंत पाटील,विशाल जाधव ,श्रीकांत पाटील,त्याच प्रमाणे घनश्याम अग्रवाल मित्र मंडळाचे पाणी अडवा पाणी जिरवा या उपक्रमाचे अध्यक्ष नितीन निकम, नगरसेवक बापू चौधरी, माजी जि प सदस्य संभाजी पाटील, दोडे गुजर संस्थांनचे संचालक प्रवीण पाटील ,वेले येथील माजी उपसरपंच विनोद पाटील,प्रकाश पाटील यावेळी हजर होते.

जलपूजन प्रसंगी तहसीलदार अनिल गावित यांनी सांगितले की आदर्श आडगाव मध्ये तरुणांचा उत्साह पाहून  खरोखर आनंद वाटला. तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी आडवा पाणी जिरवा काम उत्कृष्ट करण्यात आली असून घनश्याम अग्रवाल मित्र मंडळाच्या लोकांनी तालुक्यात मोठे काम उभे केले आहे.त्याचे  जलपूजन करता येत आहे याचा मला विशेष आनंद आहे. पाणी संवर्धनासाठी झालेल्या बदल पाहून आनंद वाटत असून विधायक कामांसाठी पुढे आलेले तरुण पेटून उठले आहेत.  ठिकाणी भविष्यात पाणी टंचाई भासणार नाही असे चित्र या ठिकाणी उभे राहताना दिसत असल्याने मोठा आनंद होतो असेही गावीत यांनी सांगितले.

पंकज समाजाचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की गाव घनश्याम अग्रवाल याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. आदर्शगाव आडगाव हे संस्काराने भरलेले गाव असून घराघरात संस्कार आहेत म्हणून गाव आदर्श होऊ शकले. आडगावात घनश्याम भाऊ सारखे दानशूर व्यक्ती भेटले हे भाग्याची गोष्ट असून गावात असेच एकूण १७ बंधारे आहेत त्या  ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी अडू शकतं .त्या बंधाऱ्यांचे खोलीकरण केले तर या ठिकाणी फार मोठी पाण्याची समस्या दूर होऊन खऱ्या अर्थाने जलक्रांती होईल असेही डॉ बोरोले यानी  सागितले.

हे खोलीकरणाचे कामात जवळपास सिचन विभागाच्या माहिती नुसार साडे पाच लाख कोटी लिटर पाण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात आले आहे.त्यामुळे गावात व परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणारा असल्याचे गावकऱ्यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध