Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ सप्टेंबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी शिरपूर तालुक्यासाठी 1 कोटी 45 लक्ष रुपये पर्यटन विकास निधी केला मंजूर
पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी शिरपूर तालुक्यासाठी 1 कोटी 45 लक्ष रुपये पर्यटन विकास निधी केला मंजूर
डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश
प्रतिनिधी: शिरपूर तालुक्यातील सुशोभीकरणासाठी व पर्यटनासाठी डॉ जितेंद्र ठाकूर यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याने सुमारे १ कोटी ४५ लाख ईतका निधी पर्यटन विभागातून मंजूर करण्यात आला आहे.यामुळे अहिल्याबाई होळकर यांचे दुर्लक्षित असलेल्या विहीरीच्या जिर्णोद्धारासाठी या निधीतून मदत मिळणार आहे.
शिरपूर तालुक्यातील विकासासाठी शुशोभिकरण व जिर्णोद्धारासाठी पर्यटन विभागातील निधीची गरज होती.यासाठी डॉ जितेंद्र ठाकूर यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पाठपुरावा केला होता अखेर शिरपूर तालुक्यासाठी १ कोटी ४५ लाख निधी पर्यटन विभागातून मंजूर करण्यात आला आहे.या निधी मुळे तालुक्यातील पर्यटन स्थळासाठी चालना मिळणार आहे.विशेष म्हणजे तालुक्यातील कित्येक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या अहिल्यापुर येथील अहिल्याबाई होळकर यांच्या विहीरीच्या जिर्णोद्धारासाठी या निधीतून १५ लाख ईतका निधी प्राप्त झाल्याने या अहिल्याबाई होळकर विहीरीचा कायापालट होणार आहे.यासह तालुक्यातील आमोदे येथील महादेव मंदिर परिसराचे शुशोभिकरणासाठी २५ लाख,आमोदे येथील गजानन महाराज मंदिर परिसरात मुलभूत सुविधासाठी २५ लाख तसेच जुने भामपूर येथील दत्त मंदिर परिसरात सभामंडप बांधकामासाठी २० लाख तर शिंगावे येथील शिव मंदिर परिसरात भक्तमंडप व सभा मंडपासाठी २५ लाख,जैतपूर येथील दुर्गा माता मंदिर परिसरात मुलभूत सुविधासाठी ३५ लाख असा एकुण १ कोटी ४५ लाख ईतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
या पर्यटन विभागाच्या निधीतून तालुक्यातील विकास कामांना मोठी चालना मिळणार आहे.पर्यटन विभागातून निधी मंजूर करण्यासाठी मंत्री जयकुमार रावल व जिल्हाध्यक्ष बबन चौधरी यांची मदत लाभले तर भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे शहराध्यक्ष हेमंत पाटील यांचे सहकार्य लाभल्याने डॉ जितेंद्र ठाकूर यांनी आभार मानले.
शिरपूर तालुक्यातील विकासासाठी भविष्यात देखील अशा प्रकारे निधी मंजूर करण्यात येणार असल्याचे डॉ जितेंद्र ठाकूरांनी यावेळी सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया :- वडिवऱ्हे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 283/2026 bNS 118[1] 351[2] आर्म act मधील गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना...
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा