Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२६

वाडीव-हे येथील गोंदे एमआयडीसी परिसरात गोळीबार करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेलबंद.



माधव खाबिया :-

 वडिवऱ्हे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 283/2026 bNS 118[1] 351[2] आर्म act मधील गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना, सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी मारुती सुझुकी एर्टिगा वाहनाने मालेगावकडून नाशिकच्या दिशेने येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.
माहितीची खात्री करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने सापळा रचला. काही वेळातच संशयित आरोपी वाहनातून त्या ठिकाणी येताना दिसून आले. पथकाने तत्काळ कारवाई करून मयूर मोहन जाधव, करण सोपान आवारे, ओंकार शरद भोसले, रोशन धोंगडे आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले असता त्यांचे ताब्यातून एक गावठी कट्टा,दोन चॉपर व गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकल हस्तगत केले आहे.प्रकाश गोंदके
ताब्यात घेतलेल्या संशयितांची प्राथमिक विचारपूस केली असता, त्यांनी सदर गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे सांगितले आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक,नाशिक ग्रामीण, श्री.डी.एस. स्वामी सर sp/ विमला मॅडम यांचे आदेशान्वये / योगेश मस्के ,पोनि/ दत्तात्रय शिंदे,पोनि/ राहुल मोरे, यांचे मार्गदर्शनाखाली PSI सुदर्शन बोडके,पोहवा/ प्रविण काकड, संदीप नागपुरे, हेमंत गिलबिले, सचिन धारनकर, मयूर कांगणे, दीपक गुंजाळ, सतीश घुगे व संतोष गांगुर्डे, शिवाजी ठोंबरे प्रवीण गांगुर्डे,माधव साळे यांच्या पथकाने केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध