Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ सप्टेंबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
*जळगांव चे आदिवासी तडवी भिल्ल समाज समन्वय समिती तर्फे दि. 29 पासून पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था समोर सुरु असलेल्या आमरण उपोषणास यश*
*जळगांव चे आदिवासी तडवी भिल्ल समाज समन्वय समिती तर्फे दि. 29 पासून पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था समोर सुरु असलेल्या आमरण उपोषणास यश*
प्रतिनिधी अजीज शेख गेल्या तीन ते चार वर्षांपासूनजळगांव जिल्ह्यातील आदिवासी तडवी भिल्ल समाजाला जातवैधता प्रमाणपत्र देण्यात नंदुरबार समिती मज्जाव करीत आहे, तडवी भिल्ल समाज संघटनेच्या वतीने वारंवार नंदुरबार समिती व पुणे टि-आर-टि-आय ला निवेदनांद्वारे पत्रव्यवहार करून हि समाजावर अन्याय होत आहे... खऱ्या आदिवासी तडवी भिल्ल जमातीतीला न्याय-हक्कापासूंन मुद्दाम डावलण्याचा प्रयत्न होत आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या गरीब आदिवासी समाजाची स्थिती अत्यंत दयनीय असून यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी समितीच्या मा. बबीता गिरी हे पुर्वग्रहदुषीत दृष्टिकोनातून समाजाचा नुकसान करत गेल्या तीन वर्षांपासून शैक्षणिक तसेच नौकरी वर लागलेल्या काही युवकांना ०८ नंबर(तडवी-भिल्ल) जातवैधता प्रमाणपत्र देत नाहीये... त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना आपले शिक्षण मध्येच सोडावं लागले व ज्या युवकांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर नौकरीस लागले होते त्यांना जातवैधता प्रमाणपत्र अभावी नौकरी सोडावी लागली आहे. त्रस्त आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा शेवटी "आमरण" चा विधान वापवावं लागत आहे. जो पर्यंत आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जळगांव जिल्ह्यातील तडवी भिल्ल समाज पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आवारात "आमरण उपोषण" करतील "मृत्यू शी झुंज झाली तरी चालेल पण आपल्या अस्तित्वासाठी आम्ही लढणारंच" असा ठाम निर्धार समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. या आमरण उपोषणाला उद्या दिनांक २९ आॅगष्ट पासून सुरूवात होणार असून जोपर्यंत संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाहीत व जमातीला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषणा सुरूच राहणार.._*
*_#आमरण उपोषणाचे कारणे:-_*
*_१)अ.क्र. ८ नंबर चे प्रमाणपत्र नाकारून अ.क्र. १३ चे प्रमाणपत्र देण्यास सक्ती करण्यात येत आहे._*
*_२) आदिवासी तडवी भिल्ल जमातीचा संवैधानिक हक्क व अधिकार हिरावण्याचा प्रयत्न केला केला जात आहे._*
*_३) पेसा क्षेत्रातील उमेदवारांची जात प्रमाणपत्र प्रकरणे रद्द करण्यात आले व काही प्रलंबित ठेवण्यात आले आहे._*
*_४) शैक्षणिक व नौकरी बाबतचे प्रकरणे सरसकट सर्वांना एकच कारण दाखवून रद्द करण्यात आले व काही प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आले आहे, त्यामुळे विद्यार्थी व नौकरीतील युवकांचे नुकसान होत आहे._*
*_५) जळगाव जिल्ह्यातील सर्व तडवी भिल्ल जमातीला ०८ ऐवजी १३ चे जात-प्रमाणपत्र (कास्ट) ची सक्ती करून फार्म नमूना "C" नुसार अर्ज करण्यास सक्ती केली जात आहे._*
*_#प्रमुख मागण्या:-_*
*_१) दिनांक ०६/०९/१९५० रोजी अनु. जमातीची पहिली यादी मा. राष्ट्रपतींनी प्रसिद्ध केलेल्या यादीनुसारच "तडवी भिल्ल" जमातीला अ.क्र. ८ नुसारच जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे._*
*_२) ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे त्यांना त्वरीत जातवैधता प्रमाणपत्र मिळावे व विनाअट प्रवेश मिळावा._*
*_३) तडवी भिल्ल जमातीचे शैक्षणिक व नौकरी संदर्भातील प्रमाणपत्रे रद्द करण्यात आलेले आहेत त्यां प्रकरणांची तात्काळ सुनावणी करून लवकरात लवकर न्याय द्यावा._*
*_४) विहीत मुदतीत वैधता प्रमाणपत्र पारीत करण्यात यावे._*
*_५) विविध प्रकरणांत नंदुरबार समितीला न्यायालयाने दंड ठोठावला आहे व उपाध्यक्षांवर गुन्हा नोंद झालेला आहे यांची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी._*
*_६) जळगाव जिल्ह्यातील तडवी भिल्ल जमातीत शासन अध्यादेशानुसार फार्म "B" नुसारच जात प्रमाणपत्र देण्यात यावे._*
*_वरील कारणे व मागण्या आदिवासी तडवी भिल्ल समाज उद्यापासून पुणे येथे आमरण उपोषणाठिकाणी मांडणार आहे. आदिवासी तडवी भिल्ल समन्वय समिती तर्फे आवाहन करण्यात येत आहे आहे कि सर्व जमातीच्या लोकांनी पुणे उपोषण स्थळीv पोहचून उपोषणा ठिकाणी आपले न्याय हक्कासाठी संविधानिक न्यायीक लढ्यात सतत् 3दिवस सुरु राहिलेल्या या आमरण उपोषणास यश मिळाले आदिवासी तडवी भिल्ल समन्वय समितीस TRTI च्या आयुक्त यांनी मागण्या मान्य असल्याचे लेखी पत्र उपोषणर्थी णा देऊन उपोषण सोडविले
उपोषणार्थी नासेरखा अकबर तडवी
कादर तडवी संजू रमजान तडवी
मुबारक अलीखा तडवी, मुराद तडवी, तसलीम तडवी,व महिला उपोषणार्थी सकीना तडवी यांनी सलग 3 दिवस उपोषण केलं तर समाजातील ऍड. याकूब तडवी, अनिल तडवी, मर्जीत हमीद, एम. बी सर, राजू हुसेन,मिरखा तडवी लूखमांन सर, मनोज तडवी तडवी भिल्ल महिला मंडळ मुंबई ,पुणे नाशिक,, जळगांव,येथील तडवी भिल्ल समाज अधिकारी,, नोकरदार व समाज बांधव बुलढाणा,, औरंगाबाद, सह महाराष्ट्र तील सर्व आदिवासी संघटना चे पुरुष महिला प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व तडवी भिल्ल समाज बांधव पुणे येथील TRTI कार्यालयासमोर ठिय्या मांडत संविधानिक मार्गाने शांततेत उपोषण केले आदिवासी आयुक्त यांनी उपोषण कर्त्यांना लेखी पत्र देत सर्व मागण्या मान्य केल्यानंतर उपोषण सोडण्यात आले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा