बोदवड, प्रतिनिधी – शहरातील न.ह.रांका हायस्कूल मध्ये शिकत असलेली अल्पवयीन पीडित शाळेची तयारी करून शाळेत जात असताना शाळेच्या गेट जवळ आरोपीने वाईट हेतूने पाठलाग करून पीडित मुलीला शाळेच्या गेट जवळ अडकवून मी तुझ्यावर प्रेम करतो आपण दोघे पळून लग्न करू असे बोलून पीडित अल्पवयीन मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला.
याप्रकरणी पीडितीच्या फिर्यादी वरून आरोपी गणेश सुनील माळी रा.बोदवड (बजरंगपुरा) याच्यावर बोदवड पोलीस ठाण्यात बाललैगिक अत्याचार (पोस्को) 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बोदवड उपपोलिस निरीक्षक भाईदास मालचे करीत आहे
तालुक्यातील ही आठवड्यातील दुसरी घटना असून गेल्या तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील नांदगाव (प्रतिभानगर) येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना नवीन असतांनाच काल दुपारी ही घटना घडली असल्याने पालक वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
या वर्षात सन (2019) मध्ये बाललैगिक अत्याचाराचे बोदवड पोलिसात चार गुन्हे नोंद झाले आहेत.
तालुक्यात रोड रोमिओनीं उच्छाद मांडला असल्यानं बाजारात, रस्त्यावरील रहदारी करीत असताना,शाळा, महाविद्यालयामध्ये मुलीची छेड काढणे अश्या प्रकारच्या घटना वारंवार घडत असून महिला व मुलींना घराच्या बाहेर निघाल्यावर संरक्षणाची गरज भासत आहे. याकडे पोलीस प्रशासनाने वेळेत लक्ष घालून कठोर पावले उचलण्याची गरज आहे.अशी जनमानसातून मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा