Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९

चोपड्यात श्रीं चे विसर्जन शांततेत : जोशपूर्ण वातावरणात निरोप ५० सार्वजनिक तर पाच गणेश मंडळांचा सहभाग






चोपडा(प्रतिनिधी )विनोद निकम,
शहरात पाचव्या दिवशी गणपती विसर्जन मिरवणूकीस सकाळी नऊ वाजेपासून सुरुवात करण्यात आली. पाचव्या दिवशी सकाळी ९  वाजेपासूनच अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी आपले मंडळ विसर्जन मार्गावर रांगेत गणपती आणले होते. शेतपुऱ्यातील नवग्रह मित्र मंडळाचा सार्वजनिक गणेश सकाळी साडे नऊ वाजता सर्व पोलीस फौज फाट्यासह शांततेत विसर्जन मार्गावर आशा टॉकीज पर्यंत आणण्यात आला.सकाळी ९.०० वाजता मनसेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल वानखेडे यांचा राणी लक्ष्मीबाई गणेश मंडळ,पांचाळेश्वर गणेश मंडळ,संत गोरोबा कुंभार मित्र मंडळ,त्रिदेव गणेश मंडळ,बाळकृत गणेश मंडळ ,शिवसाम्राज्य गणेश मंडळ,हिंदुराजे प्रतिष्ठान गणेश मंडळ,रथगल्ली मित्रमंडळ , दोस्ती गणेश मंडळ,नवनाथ मित्र मंडळ,जय बालाजी गणेश मंडळ,जय भवानी मित्र मंडळ,क्रांती क्लब गणेश मंडळ,शिवसृष्टी मित्र मंडळ,बालविर गणेश मंडळ,महादेव गणेश मंडळ,मेघुराया मित्र मंडळ,अष्टविनायक गणेश मंडळ,राजमाता अहिल्याबाई गणेश मंडळ,शिवतेज गणेश मंडळ,बडगुजर नवयुवक मित्र मंडळ,संत सावता मित्र मंडळ,फुले नगरचा मित्र गणेश मंडळ,महात्मा फुले गणेश मंडळ,समता नगर मित्र मंडळ,बारीवाडा गणेश मंडळ यांचेसह अनेक गणेश मंडळांचे विसर्जन मिरवणुकीत रांगेत आलेले होते.

मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंगावर सैनिक गणवेश,इतर सामाजिक संदेश देणारी कपडे परिधान केलेली होती. सायंकाळी ७ वाजे पर्यंत जवळपास ८ मंडळे मुस्तफा बाबा दर्गा पासून आझाद चौकाकडे रवाना झाली होती.रात्री बारा वाजे पर्यंत मिरवणूक आटोपण्याची शक्यता वर्तविली जात होति,
दरम्यान सालाबादप्रमाणे यंदाही भाजपा, कांग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,व नगरपालिका प्रशासन विभागाने गणेश भक्ताचे स्वागतासाठी बोहरा गल्लीत शुभेच्छा स्टाल उभारले होते. शहरात एकूण ५० सार्वजनिक गणेश मंडळे आजच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. सकाळ पासूनच अनेक मंडळ नीं अतिउत्साहात मिरवणुकीत सहभागी झाल्याचे दिसत होते. यावेळी तालुक्यातील राजकीय नेते व पदाधिकारी सहभागी झाले होते.त्यात विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी,माजी आमदार कैलास पाटील, इंदिराताई पाटील,बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर पाटील, पीपल बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, श्यामकांत सोनवणे,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजाराम पाटील,शहराध्यक्ष कालिदास चौधरी,रमाकांत सोनवणे,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील,धर्मेंद्र मगरे, प्रफुल्ल स्वामी,पंचायत समितीचे उपसभापती एम व्ही पाटील,शहर अध्यक्ष आबा देशमुख,नगरसेवक महेश पवार, विधान सभेचे क्षेत्र प्रमुख विकास पाटील,अमृतराज सचदेव,संजय कानडे, मनीष पारीख,प्रवीण गुजराथी,शेतकी संघ चेअरमन शेखर पाटील, दीपक जोहरी,प्रवीण जैन, भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र पाटील,तालुका अध्यक्ष व पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके यांचेसह सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते,

 चोपडा शहर संवेदनशील असल्याकारणाने यावर्षी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी मुंबई येथील द्रुत कार्य बल(रॅपिड ऍक्शन फोर्स) चे अधिकाऱ्यांसह ११० कर्मचारी, २०० पोलीस अधिकारी व कर्मचारी, गृहरक्षक दलाचे कर्मचारी,अमळनेर येथील प्रांताधिकारी सीमा अहिरे,तहसीलदार अनिल गावित,नायब तहसीलदार जितेंद्र पंजे, राजेश पऊळ,चाळीसगाव येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गोरे,सहाय्यक पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, यांचेसह कर्मचाऱ्यांनी तगडा बंदोबस्त ठेवला.विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे मिरवणुकीवर नजर ठेवून शूटिंग होत असल्याने ,रात्री एक वाजे पर्यंत विसर्जनाचे शांततेत सांगता झाली,



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध