Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९
प्राध्यापक ज्योती धनराज भोई यांचा रा.स.प. मध्ये प्रवेश
अमळनेर( प्रतिनिधी )अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक ज्योती भोई यांनी मुंबई येथे झालेल्या अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त महामेळाव्यात राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश घेतला.
या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माननीय नामदार मंत्री महादेवजी जानकर ,ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे , शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, आमदार राहुल कुल पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष श्रद्धा भातंबेकर यांच्या
उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. यावेळी शितल चिंचोरे (धनगर) , संगीता पाटील (धनगर) यावेळी उपस्थित होते श्रीमती ज्योती भोई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा प्रमुख म्हणून तीन वर्षे काम पाहिले आहे तसेच महिलांच्या हक्कासाठी व अधिकार मिळवून देण्यासाठी महिलांच्या बाजूने सतत असतात त्यांना इतर सामाजिक संघटनांच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. तसेच प्राध्यापक ज्योती धनराज भोई हे भोई समाजाच्या नाशिक विभागीय महिला अध्यक्ष आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा