Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

बोराडीत शापोआ योजनेंतर्गत स्वयंपाकींचे प्रशिक्षण संपन्न





कुरखळी प्रतिनिधी - योगेश्वर मोरे
बोराडी येथील मातोश्री बनुमाय कन्या विद्यालयात जिल्हा परिषद धुळे शैक्षणिक विभागामार्फत शालेय पोषण आहार योजना संदर्भात बोराडी बीट अंतर्गत स्वयंपाकी तथा मदतनीस साठी प्रशिक्षण संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपूर पंचायत समितीचे शालेय पोषण अधिक्षक पी. झेड. रणदिवे होते. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी आर. के. गायकवाड, केंद्रप्रमुख जितेंद्र जोशी, किशोर भदाणे उमर्दा इ. उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शक मनोहर वाघ यांनी शालेय पोषण आहार संबधी मार्गदर्शन करताना सांगितले की स्वयंपाक करताना पदार्थ स्वच्छ असावेत, धान्य व भिजीपाला स्वच्छ करून धुवुन वापराव, स्वयंपाकाच्या भांड्यांवर झाकण ठेवावे यामुळे जीवनसत्व नष्ट होणार नाही किंवा घाण पडणार नाही. मोड आलेल्या कडधान्याचा वापर करावा, अर्धा तास आधी चव घ्यावी, वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य तपासणी नियमित करावी. विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. परिसरात किटक, मोकाट प्राणी नसावे, साहित्य साठवण ठिकाणी स्वच्छता असणे आवश्यक असून त्याविषयी विशेष लक्ष असायला हवे.

यावेळी बोराडी, कोडीद, उमर्दा येथील 166 स्वयंपाकी उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी एन. एम. सोनवणे, छोटु राजपुत, गणेश भामरे, डी. जे. चव्हाण, एस. ए. अहिरे यांनी परिश्रम घेतले.
सुत्रसंचालन चंद्रकांत बडगुजर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध