Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २ जुलै, २०२६
अमळनेर पोलिसांचे 'कोम्बिंग ऑपरेशन'; अवैध धंदे, फरार आरोपी व वॉरंटधारकांवर मोठी कारवाई
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अमळनेर पोलिसांनी मोठी कारवाई केली. या मोहिमेत अवैध दारू, फरार आरोपी, वॉरंटधारक तसेच गुन्हेगारांची तपासणी करून अनेकांवर कारवाई करण्यात आली.
पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे २.३० ते सकाळी ७.०० या वेळेत ही मोहीम राबविण्यात आली. यासाठी अमळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखा, एलसीबी तसेच एसआरपीएफचे अधिकारी व जवान सहभागी झाले होते.
कारवाईचा तपशील :
अवैध दारू साठवणूक व विक्री प्रकरणी २ आरोपींना अटक करून सुमारे ५२ लिटर गावठी दारू व पाच मसाला जप्त.
रासायनिक दारू तयार करणाऱ्या ठिकाणी छापा टाकून ६ आरोपींवर कारवाई, मोठ्या प्रमाणात केमिकल, गावठी दारू व साहित्य जप्त करून नष्ट.
विविध न्यायालयीन पकड वॉरंटमधील ७ आरोपींना अटक.
९ जामिनी वॉरंटची बजावणी.
११० संशयित आरोपींची तपासणी करून १०० जणांना पोलीस ठाण्यात आणून इन्फॉर्मेशन फॉर्म भरून घेण्यात आले.
दाखल गुन्ह्यांतील १२ फरार आरोपींना अटक.
चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या सहकार्याने संयुक्त कारवाईत १ गावठी कट्टा, १ जिवंत काडतूस व १ मोबाईल जप्त करून ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
अमळनेर पोलिसांनी ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगितले असून, संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उपसंपादक :- माधव खाबिया सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत सायंकाळच्या सुमारास पायी चालणारे महीलांचे गळयातील सोनसाखळ...
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा