Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ जुलै, २०२६
२कोटी १० लाखांचा अवैध विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त.
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण
विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता. चांदवड) येथे सापळा रचून कंटेनरमधून अवैध मद्यसाठा जप्त केला. पथकाने दोघांना अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.पथकाने कंटेनर (एनएल ०१ एएफ ३५३८) मध्ये चालक युनूस युसूफ पठाण, जानी इकबाल खान, रऊफ लतिफ शेख यांना ताब्यात घेतले. पथकाने गोवा राज्यात निर्मित रॉयल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या एकूण ७२ हजार प्लास्टिक सीलबंद बाटल्यांचे १५०० बॉक्स व कंटेनर असा एकूण २ कोटी १० लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी करीत आहेत.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा