Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १५ सप्टेंबर, २०१९
अनिल बोरनारे यांची महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन महामंडळावर नियुक्ती
रावेर:प्रतिनिधी: अजीज शेख तालुक्यातील निंभोरा येथील रहिवासी व सध्या मुंबईत असलेले अनिल बोरनारे यांची महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन महामंडळाच्या अशासकीय सदस्य (उपाध्यक्ष) पदी नियुक्ती केली. काल मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी अनिल बोरनारे यांच्या नियुक्तीची घोषणा करून त्यांचा सत्कार केला त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार, एसएससी बोर्डाचे मुंबई विभागीय अध्यक्ष कृष्णकुमार पाटील, सचिव शरद खंडागळे, सह-सचिव संदीप संघवी आदी अधिकारी उपस्थित होते.
अनिल बोरनारे हे भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष असून त्यांचा मुंबई-कोकण विभागात अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी जवळचा संबंध आहे. महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन मंडळाला राज्य शासनाच्या महामंडळाचा दर्जा असून शालेय शिक्षणमंत्री हे नियामक मंडळाचे अध्यक्ष असतात. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक, सामाजिक न्याय विभागाचे सचिव, वित्त विभागाचे सचिव, जवाहरलाल नेहरू फंड नवी दिल्लीचे संचालक हे सदस्य म्हणून काम पाहतात.
महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन महामंडळावर केलेल्या नियुक्तीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजपा नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार राजूमामा भोळे, आमदार हरिभाऊ जावळे, भाजपा शिक्षक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष कल्पना पांडे यांचे अनिल बोरनारे यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणार
भारताची भावी पिढी सृजनशील, संवेदनशील व सुदृढ व्हावी यासाठी बालभवनच्या माध्यमातून राज्यभरातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणार असून राज्य शासनाने केलेली नियुक्ती सार्थ करून दाखविणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया :- वडिवऱ्हे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 283/2026 bNS 118[1] 351[2] आर्म act मधील गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना...
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा