Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ सप्टेंबर, २०१९
*विवेकानंद विद्यालयात संस्कृत दिन उत्साहात साजरा*
चोपडा(प्रतिनिधी)विनोद निकम येथील विवेकानंद विद्यालयात संस्कृत दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय पोतदार,विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आर्य गिरी नंदिनी स्तोत्राने कार्यक्रमाची सुरुवात केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय पोतदार यांनी विद्यार्थ्यांना साध्या-सोप्या भाषेत संस्कृत दिन व संस्कृत
विषयाचे महत्त्व व त्यातील माधुर्य पटवून दिले व संस्कृत दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सरल भाषा संस्कृतम् ,मनसा सततं स्मरणीयम् ,सागरं सागरीयं नमामोवयम् अशी गीते विद्यार्थ्यांनी सादर केली.इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी नाटिका सादर केली. तसेच विद्यार्थ्यांनी विविध संस्कृत भाषेतील संवाद सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक राधेशाम पाटील यांनी केले तर संस्कृत दिनाच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व कार्यक्रम यशस्वी
करण्यासाठी विद्यालयाच्या संस्कृतशिक्षिका स्मृती माळी यांनी परीश्रम व मेहनत घेतली.एकता मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा