Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
वाढदिवसानिमित्त संकल्प करत आरंभच्या हरीत नळदुर्ग उपक्रमात आनंद काटकर यांचा सहभाग
वाढदिवसानिमित्त संकल्प करत आरंभच्या हरीत नळदुर्ग उपक्रमात आनंद काटकर यांचा सहभाग
नळदुर्ग प्रतिनिधी विशाल डुकरे आरंभ बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पर्यावरणाच्या रक्षणासाठी चालू केलेल्या हरित नळदुर्ग संकल्पाअंतर्गत "एक वाढदिवस एक झाड" या उपक्रमाच्या माध्यमातून आज नळदुर्ग शहरातील नेत्रतज्ञ डॉ. आनंद काटकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छारुपी सत्कार वृक्षांची रोपे देऊन करण्यात आला. श्री काटकर यांनी आरंभच्या हरित नळदुर्ग उपक्रमाचे कौतुक करत या उपक्रमात सहभाग घेऊन वाढदिवसा दिवशी वृक्षलागवडीचा संकल्प केला. बाळासाहेब ठाकरे नगर येथे असलेल्या ओपन स्पेसमध्ये, येथील स्थानिक नागरिकांच्या हस्ते येत्या रविवारी पंधरा झाडे लावणार असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. आनंद काटकर, संजय जाधव, हत्ते, आरंभ सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष विशाल डुकरे, सचिव श्रमिक पोतदार, कोषाध्यक्ष सागर हजारे, प्रसिद्धी प्रमुख आयुब शेख, मयूर महाबोले, अभिषेक आवटे, अनिल जाधवर, लखन खांडेकर, आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा