Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९
*ग्रामपंचायत बाभुळदे मार्फत शिक्षकांचा सत्कार*
कुरखळी प्रतिनिधी - योगेश्वर मोरे
आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत बाभुळदे मार्फत जिल्हा परिषद शाळा बाभुळदे येथील मुख्याध्यापक श्री.भरत पवार सर व उपशिक्षक श्री राकेश पाटील ह्या दोघांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना श्री. सरदार रघुनाथ पाटील यांनी दोन वर्षाच्या कालखंडात शाळेचे रूप कसे पालटले. याविषयी सांगितले शिक्षकांनी केलेल्या परिश्रमाचे फलित म्हणूनच आज शाळा ही नवीन रूपात निर्माण झाली आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सदर दोन वर्षात शाळेस रंगरगोटी करणे, डिजिटल वर्गामार्फत चालणारे शिक्षण, विविध शैक्षणिक साहित्याच्या मार्फत केले जाणारे ज्ञानरचनावादी अध्यापन, शाळेत राबविले जाणारे सहशालेय उपक्रम, शाळेत जलशुध्दीकरण यंत्राची सोय , संरक्षक भिंतीचे बांधकाम, यासोबतच विद्यार्थी गुणवत्ता बाबतची प्रगती या सर्व कामांबद्दल शिक्षकांचे विशेष कौतुक केले. उपसरपंच सौ. सुरेखाताई निकुंभे यांनी यापुढील काळातही शाळेस आवश्यक असलेल्या सर्व सुविधा 14 व्या वित्त आयोगातून पुरविल्या जातील असे आश्वासन दिले.
सदर कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत बाभुळदे सरपंच सौ.शारदाताई पाटील, उपसरपंच सौ. सुरेखाताई निकुंभे, ग्रा.प.सदस्य श्री. संजय पाटील, श्री. शांताराम महाजन तसेच माजी पंचायत समिती सदस्य श्री. किरण पाटील, विकास सोसायटी व्हाईस चेअरमन श्री. देविदास निकुंभे, श्री. महेन्द्र पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ सुनिता कोळी व सदस्य इ.मान्यवर उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा