Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांचा हस्ते गृहनिर्माण व क्षेत्रविकास (म्हाडा) महामंडळ नासिक उपसभापती बबनराव चौधरी यांचा सत्कार





शिरपुर : (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांची  गृहनिर्माण व क्षेत्र विकास (म्हाडा) महामंडळ नासिक उपसभापती (राज्यमंत्री दर्जा) पदी नियुक्ती झाल्याबद्दल केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा भाजपा माजी प्रदेशाध्यक्ष ना. रावसाहेब दानवे यांचा हस्ते दोंडाईचा येथे सत्कार करण्यात आला. शिंदखेडा विधानसभा मतदार संघातील पन्ना प्रमुख यांचा मेळावा झाला. त्याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा हस्ते जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अन्न औषध प्रशासन, पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावळ, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खा. डाॅ. सुभाष भामरे, बेटी बचाव बेटी पढाव अभियान राष्टीय संयोजक डाॅ. राजेंद्र फडके, भाजपा उत्तर महाराष्ट संघटन मंत्री अॅड. किशोर काळकर, प्रदेश चिटणीस तथा धुळे जिल्हा प्रभारी लक्ष्मणराव सावजी, दोंडाईचा नगराध्यक्षा सौ. नयनताई रावळ, शिंदखेडा नगराध्यक्ष सौ. रजनीताई वानखेडे, दोंडाईचा कृउबा समिती सभापती नारायण पाटील, साक्री कृउबा समिती सभापती पोपटराव सोनवणे, भाजपा जिल्हा सरचिटणीस वसंतराव बच्छाव, कामराज निकम, अरुण धोबी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. संजिवीनी सिसोदे, भाजपा शिंदखेडा तालुकाध्यक्ष नथ्थु पाटील, दोंडाईचा शहराध्यक्ष प्रविण महाजन, शिंदखेडा शहराध्यक्ष दिनेश सुर्यवंशी आदी उपस्थित होते. या गृहनिर्माण व क्षेत्रविकास (म्हाडा) महामंडळ नासिक उपसभापतीना राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध