Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

गावात पोचले नाडेप कंपोस्ट खतनिर्मिती तंत्र



पुणे प्रतिनिधी निखिल राजपूत:जुन्नर  
पुणे कृषी महाविद्यालयातील
कृषिदूतांनी पिपंळवंडी येथील
शेतकऱ्यांना नाडेप कंपोस्टनिर्मितीची
माहिती प्रात्यक्षिकाद्वारे समजावून
सांगितली. याचबरोबरीने जमीन
सुपीकतेसाठी सेंद्रिय खताचे महत्त्व आणि
त्याच्या वापराबाबतही माहिती दिली.
प्रात्यक्षिकाला सरपंच श्री. सोमनाथ माळी, उपसरपंच श्री. प्रदिप चाळख, श्री. भिमाजी कोकाटे, श्री. रमेश कोकाटे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.  कृषिदुत रुपेश आगळे, गोपाल आरमाळ, किरण ढाकणे, गौरव गाढे, अजय गावंडे, ऋषिकेश होनमणे यांनी मार्गदर्शन केले.
प्रात्यक्षिकाचे आयोजन कृषिदूत  यांनी केले होते.
कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. कारंडे सर यांनी मार्गदर्शन
केले.


-----------------------------------------------
आर्वी मधे महिला बचत गटांना मार्गदर्श
-----------------------------------------------




पुणे प्रतिनिधी :आर्वी येथील ग्राम पंचायत कार्यालया समोर 'ग्रामीण कृषि कार्यानुभव' कार्यक्रमा अंतर्गत कृषि महाविद्यालय पुणे येथून आलेल्या कृषिदूतांनी 'महालक्ष्मी' बचत गटातील महिलांना घरगुती पद्धतीने दुधपासुन पनीर बनवायला शिकवले. " बचत गटांमार्फत बाजारात मागणी असलेले असे दुग्ध पदार्थ बनवल्यास बचत गटांना फायदा होऊ शकतो तसेच महिलांना स्वयं रोजगार देखील उपलब्ध होऊ शकतो" असे महिला बचत गट अध्यक्ष सौ. विजया डोंगरे यावेळी म्हणल्या. सुमारे ३० महिला ह्यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी शुभम करपे, आकाश साबळे, ऋषीकेश काळे, राघव रेड्डी व गौरव पाटील या कृषि दूतांनी मार्गदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध