Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९
कुरखळी शाळेस मुंबई पथकाची भेट
कुरखळी प्रतिनिधी - योगेश्वर मोरे
शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कुरखळी येथे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या श्रीमती पाठक व त्यांच्या टीमने आकस्मिक भेट दिली.
या भेटीत त्यांनी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत बांधकाम झालेल्या तीन वर्ग खोल्यांची पाहणी केली.
बांधकामाचा दर्जा, केलेले रंगकाम, खिडक्या- दरवाजे, विद्युतीकरण, हँडवाँश स्टेशन, डिझाईन काम आदींची पाहणी करून समाधान व्यक्त करत शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षकांचे कौतूक केले.
यावेळी बांधकाम विभागाचे अभियंते शिंदे रावसाहेब , धनंजय रावसाहेब, शिरपूर अभियंता अनूप बडगुजर, लेखापरिक्षक गिरी उपस्थित होते. शाळेतील भौतिक सुविधा यात स्वच्छतागृह, भोजनकक्षाचीही पाहणी पथकाने केली.
पथकाचे स्वागत पोपट शिरसाठ, शा. व्य. समिती अध्यक्ष आत्माराम कोळी, शिक्षक ज्ञानेश्वर माळी यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
धुळे प्रतिनिधी - स्व.सुताम पिंगळे मेमोरियल ट्रस्ट, धुळे संचलित श्रीमती शांताबाई पिंगळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा