Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९
टेकवाडे येथे ' शिक्षक दिन ' उत्साहात साजरा.
कुरखळी प्रतिनिधी - योगेश्वर मोरे
टेकवाडे ता. शिरपूर येथील आर . सी. पटेल माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आजच्या दिवशी शिक्षकांची भूमिका बजावली. त्यात बहुसंख्य विद्यार्थी शिक्षकांनी सहभाग नोंदवून उल्लेखनीय अध्यापन करण्याचा प्रयत्न केला.
सुरुवातीला ' सर्वपल्ली राधाकृष्णन ' यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्या वेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री सिद्धार्थ पवार, पर्यवेक्षक श्री. बी. एस. जमादार ,विद्यार्थी शिक्षक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. गीतमंच च्या विद्यार्थ्यांनी श्रवणीय गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. आजच्या दिवसाचे वैशिष्ट्ये म्हणजे शिक्षकांची संपूर्ण भूमिका विद्यार्थी शिक्षकांनी बजावली. यात प्राचार्य म्हणून कु. भाग्यश्री गिरासे हिने काम पाहिले .
विद्यालयातील उपशिक्षक श्री. एस. पी. महाजन यांनी आपले विचार मांडतांना शिक्षक दिनाचे महत्व सांगितले तसेच उपशिक्षक श्री. एस. एम. पाटील यांनी आपले विचार मांडतांना भविष्यातील शिक्षक कसा असावा ? याबाबत मार्गदर्शन करून शिक्षक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच काही विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले .
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य
श्री. सिद्धार्थ पवार यांनी आपले विचार मांडतांना आजच्या शिक्षकाची समाजाला असलेली गरज , शिक्षकाची भूमिका तसेच त्यांचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधन केले.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षिका कु. लोहार किंजल विठ्ठल व वानखेडे पराग दिलीप यांनी केले.
आजच्या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचा-यांनी प्रयत्न केलेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा