Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९

राजेंद्र निकुंभ यांची विद्या भारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थानच्या "प्रचार व प्रसार प्रमुख" पदी निवड


पंकज पाटील (उपसंपादक तरुण गर्जना)
 
अमळनेर  येथील लोकमान्य विद्यालयाचे  मा. मुख्याध्यापक श्री. राजेंद्र निकुंभ यांची विद्या भारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान च्या "प्रचार व प्रसार प्रमुख" पदी निवड झाली, या अंतर्गत त्यांना आता ११ जिल्ह्याचे विद्या भारतीच्या प्रचार व प्रसार  प्रमुख म्हणून दायित्व मिळाले  आहे.
 
विद्या भारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान खालील काम करते.
  • शिक्षक प्रशिक्षण
  • संस्था चालक प्रशिक्षण
  • वैदिक गणित प्रशिक्षण
  • योग, संस्कृत, नैतिक शिक्षण प्रशिक्षण
  • खेलकुद प्रशिक्षण
  • बालिका शिक्षण
  • संस्कृती ज्ञान परिक्षा
 
यासारख्या ४० आयामांवर काम करणारी संघटना आहे.परभणी येथे झालेल्या विद्याभारतीचा प्रांत सभेत या जबाबदारीची घोषणा करण्यात आली. देवगिरी व विदर्भ प्रांताचे संघटन मंत्री मा. शैलेशजी जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर देवगिरी प्रांत मंत्री मा. प्रकाशजी पोद्दार व परभणी जिल्हा अध्यक्ष मा. चलवदे सर उपस्थित होते.
 
यापुर्वी निकुंभ सरांनी जळगाव जिल्हा मंत्री, जळगाव विभाग मंत्री, प्रांत संस्कृती ज्ञान परिक्षा प्रमुख, सांस्कृतिक मंत्रालय कार्यशाळा संयोजक यासारख्या विविध जबाबदाऱ्या भुषविल्या आहेत. त्यांच्या या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध