Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी शिरपूर तालुक्यासाठी 2कोटी 68 लक्ष निधी मंजूर ,डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश
पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी शिरपूर तालुक्यासाठी 2कोटी 68 लक्ष निधी मंजूर ,डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश
शिरपूर:प्रतिनिधी:तालुक्यातील सुशोभीकरणासाठी व पर्यटनासाठी डॉ जितेंद्र ठाकूर यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याने 2 कोटी 68 लक्ष अंदाजित निधी मंजूर केला असून त्यापैकी सुमारे १ कोटी ४५ लाख ईतका निधी वितरीत करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यात अहिल्यापुर येथील अहिल्याबाई होळकर यांचे दुर्लक्षित असलेल्या विहीरीच्या जिर्णोद्धाराश अनेक गावांना पर्यटन निधीतून मदत मिळणार असल्याने पर्यटनाला चालना मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे डॉ जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.
शिरपूर तालुक्यातील विकासासाठी शुशोभिकरण व जिर्णोद्धारासाठी पर्यटन विभागातील निधीची गरज होती.यासाठी डॉ जितेंद्र ठाकूर यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर शिरपूर तालुक्यासाठी १ कोटी ४५ लाख निधी पर्यटन विभागातून वितरीत करण्यात आला आहे. या निधी मुळे तालुक्यातील पर्यटन स्थळासाठी चालना मिळणार आहे.विशेष म्हणजे तालुक्यातील कित्येक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या अहिल्यापुर येथील अहिल्याबाई होळकर यांच्या विहीरीच्या जिर्णोद्धारासाठी 50 लक्ष निधी पैकी १५ लाख ईतका निधी प्राप्त झाल्याने या अहिल्याबाई होळकर विहीरीचा कायापालट होणार आहे.यासह तालुक्यातील आमोदे येथील महादेव मंदिर परिसराचे शुशोभिकरणासाठी 41.82 लक्ष मंजूर निधी पैकी २५ लक्ष,आमोदे येथील गजानन महाराज मंदिर परिसरात मुलभूत सुविधासाठी 50 लक्ष निधी पैकी २५ लक्ष तसेच जुने भामपूर येथील दत्त मंदिर परिसरात सभामंडप बांधकामासाठी 40 लक्ष मंजूर निधी पैकी २० लक्ष वितरीत तर शिंगावे येथील शिव मंदिर परिसरात भक्तमंडप व सभा मंडपासाठी 40 लक्ष मंजूर निधी पैकी २५ लक्ष वितरित, जैतपूर येथील दुर्गा माता मंदिर परिसरात मुलभूत सुविधासाठी47 लक्ष मंजूर निधी पैकी ३५ लक्ष निधी वितरीत करण्यात आला असून असा एकुण 2 कोटी 68लक्ष निधी मंजूर करून त्यातील १ कोटी ४५ लाख ईतका निधी वितरीत करण्यात आला आहे.
या पर्यटन विभागाच्या निधीतून तालुक्यातील विकास कामांना मोठी चालना मिळणार आहे. पर्यटन विभागातून निधी मंजूर केल्याबद्दल मंत्री जयकुमार रावल व भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचे आभार मानले. यासाठी खासदार हिनाताई गावित, तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील यांसह भाजपा पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले .
शिरपूर तालुक्यातील विकासासाठी भविष्यात देखील अशा प्रकारे निधी मंजूर करण्यात येणार असल्याचे डॉ जितेंद्र ठाकूरांनी यावेळी सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा