Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९

शिक्षक दिनी शिक्षकाचा सन्मान




प्रतिनिधी बहाळ / चाळीसगाव येथे राजपुत मंगल कार्यालयात शिक्षक दिनी तालुक्यातील शिक्षकाःचा सन्मान करण्यात आले .सभापती पुरस्कृत आदर्श शिक्षक  सन्मान सोहळा संपन्न चाळीसगाव पंचायत समितीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळे मधील केंद्रनिहाय, आश्रम शाळा, माध्यमिक शाळेतील शिक्षक नगरपालिका शाळा मधील मुख्याध्यापक,  शिक्षक बंधू-भगिनींना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला या पुरस्कारासाठी उपस्थित हजारो शिक्षक बंधूंनी समाधान व्यक्त केले व सभापतींचे अभिनंदन केले याप्रसंगी 190 शाळेच्या मुख्याध्यापकांना सन्मानित करण्यात आले तसेच 30 आदर्श शिक्षक सन्मान  पुरस्कार देण्यात आले. पाणी  फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेमध्ये तालुक्यातील 76 ग्रामपंचायती मधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री के बी दादा साळुंके यांना  देण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून  संपदा ताई पाटील, पंचायत समिती सदस्य अजय पाटील,  भाऊसाहेब पाटील,  सुभाष पाटील,  चकोर सर, शिवाजी सोनवणे सर पियुष साळुंखे, माजी जिप सदस्य साहेबराव तात्या साळुंके, नगरपालिका गटनेते संजू आबा पाटील, राज्य समन्वयक किशोर पाटील कुंजर कर, शालिग्राम निकम सर,  अतुल पाटील साहेब गटशिक्षणाधिकारी विलास भोई साहेब, शिक्षक संघटना चे विविध पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे पुरस्कार घेताना अश्रू अनावर झाले अनेक शिक्षकांनी सपत्नीक सत्कार स्वीकारला कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण विभागातील  अनेक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले व् शासनाच्यावतीने कोणतेही अनुदान न घेता सभापती  स्मितल बोरसे, व माजी पंचायत समिती सदस्य दिनेश भाऊ बोरसे यांनी स्वखर्चातून कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  भैय्यासाहेब वाघ सर यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध