Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९
सौ. डि. आर. चौधरी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी केला शिक्षक दिन साजरा
प्रतिनिधी अजीज शेख रावेर निंभोरा ता.रावेर तालुक्यातील निंभोरा येथील सौ.डि.आर.चौधरी माध्यमिक विद्यालयात ५ सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे सर्व कामकाज विद्यार्थ्यांकडून सांभाळण्यात आला.विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य करुन शिक्षकांच्या कार्याचा अनुभव घेतला.तसेच कार्यक्रमाच्या दुस-या भागात
आजच्या दिवसाचे विद्यार्थी मुख्याध्यापक तौसिफ शेख या विद्यार्थ्याने प्रतिमांना हार घालुन पुजन केले.यानंतर स्वच्छता पंधरवाड्या निमित्त स्वच्छतेचे महत्व सांगणारी नाटिका इयत्ता ९ वी च्या विद्यार्थिनींनी सादर केली.यानंतर इयत्ता ८वी ची विद्यार्थिनी सानिया खान हिने सावित्री बाईंची शिक्षणाचे महत्व पटवून देणारी एकांकिका सादर केली. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे महत्व आपल्या भाषणातून सांगितले.यानंतर शाळेतील सर्वांनी स्वच्छतेची व मतदार जाग्रुतीची शपथ घेतली.यानंतर विद्यार्थी शिक्षक व मुख्याध्यापक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर शाळेतील शिक्षक श्री.चंद्रकांत देशमुख सर ,श्री.नरेंद्रकुमार दोडके सर व श्री.गोकुळ भोई सर यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सायराखान मॅडम यांनी शिक्षकांचा व विद्यार्थी मुख्याध्यापक व शिक्षकांचा तसेच शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा सत्कार केला व आपले अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयत्ता १० वी ची विद्यार्थिनी कांचन पवार हिने केले तर आभार प्रदर्शन साक्षी सिरसाड या विद्यार्थिनीने केले.कार्यक्रम यश स्वितेसाठी श्री.सुर्यकांत पाटिल सर,श्रीमती हेमलता नेमाडे मॅडम ,श्री.उदय अवसरमल सर ,सरफराज तडवी सर तसेच मुकुंदा फालक व तुषार भंगाळे यांनी सहकार्य केले.
(ऐनपूर महाविद्यालयात संस्थेतर्फे) (शिक्षकांचा संन्नमान.)
प्रतिनिधी अजीज शेख निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथून जवळच ऐनपूर येथिल सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात सर्वप्रथम डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रतिमांना अभिवादन करून दरवर्षा प्रमाणे सर्व प्राध्यापक व प्राध्यापेकेतर कर्मचाऱ्यांचा रूमाल टोपी देवून संस्थेचे अध्यक्ष भागवत पाटील, चेअरमन श्रीराम पाटील, सचिव संजय महाजन, विकास महाजन व ईतर मान्यवरांच्या हस्ते सन्नमानपूर्वक स्वागत करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयाचे रोपटे १९९३ साली लावण्यात आले होते. या रोपट्याची जोपासना खुप बिकट परिस्थीती सहन करूण झुनकाभाकर व भजी खाऊन तत्कालीन प्राध्यापक व प्राध्यापेकेतर कर्मचारी वर्गांनी केली त्याचे आज विशाल वट वृक्ष झालेले आहे त्याच्या छायेत काही नविन प्राध्यापक आनंदात आश्रय घेत आहेत. दर वर्षी पदवि संप्पादन करूण या महाविद्यालयातून विद्यार्थी बाहेर पडत आहे. यासर्व कार्याचे विषय लक्षात घेवून शिक्षक दिनाचे औचित्य साधून दर वर्षी संस्थेकळून प्राध्यापक व प्राध्यापेकेतर कर्मचाऱ्यांना रूमाल टोपी देवून गौरविण्यात येते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भागवत पाटील हे होते. प्राध्यापकांमधून उमवि व्यावस्थापण परिषद सदस्य प्रा.एन.यू.बारी यांनी शिक्षक दिनाचे महत्व सांगत संस्थेचे त्रृण व्याक्त केले.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन उपप्राचार्य डॉ.पी.आर महाजन यांनी केले तर आभार उपप्राचार्या डॉ.सौ.निता वाणी यांनी मानले.
फोटोत :- १) सन्मानीत सर्व प्राध्यापक वर्ग.
२) मनोगत व्याक्त करतांना उमवि व्यावस्थापण परिषद सदस्य प्रा.एन.यू बारी
(तांदलवाडी*येथे जि.प.उपाध्यक्ष )(मा.श्री.नंदुभाऊ महाजन यांच्या )(वाढदिवसानिमित्त)
प्रतिनिधी अजीज शेख तांदलवाडी ता.रावेर तालुक्यातील जी.एम (GM) फाउंडेशन तर्फे व दृष्टी यज्ञ अभियानांर्गत आयोजित मोफत डोळे तपासणी म्हणूनव मोफत चष्मे वाटप (350 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.) तसेच भाजपा व महाएकता फाउंडेशन तर्फे आयोजित "रक्तदान" शिबिराप्रसंगी उपस्थित जि.प.उपाध्यक्ष मा.श्री.नंदुभाऊ महाजन तसेच सोबत पं.स.सदस्या सौ.कविताताई कोळी,सरपंच श्रीकांतभाऊ महाजन,यु.मो.ता.उपाध्यक्ष श्री हरीलाल कोळी,ग्रा.पं.सदस्य श्री नारायण पाटील,श्री नितिन महाजन,श्री किरण चौधरी,श्री सुनिल चौधरी,श्री अरुणदादा पाटील,श्री उदयभान कोळी,श्री गोकुळ झाल्टे,श्री जितेंद्र महाजन,श्री गोकुळ चौधरी,श्री नितिन सपकाळे,श्री योगेश्वर कोळी,श्री भागवत कोळी,श्री रमेश धनगर,श्री राहुल पाटील,श्री विलास महाजन,श्री शशांक पाटील,श्री गजानन महाजन,श्री मुन्ना पाटील,श्री गोपाळ पाटील,श्री अक्षय चौधरी,श्री अभिजीत तायडे,श्री निलेश महाजन इ.तसेच भाजपा कार्यकर्ते,तज्ञ डॉक्टर,व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा