Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९
*समाज पटलावरील मानसिकता*
मानवी सामाजिक नात्यात जर सर्वात मोठा "शत्रू "कुणी असेल तर तो म्हणजे "गैरसमज"!!
अपने अस्तित्व और हक के लिए जरूर लडे चाहे आप कितने ही कमजोर क्यों ना हो
राज्यातील समाज स्तरावरील मानसिकता ही आज गैर समजातुन ढासळत चाललेली आहे की काय? असा भास काही ठिकाणी होतांना दिसतो आहे. कोणी वैयक्तिक मानसिकतेत कोणी आपल्याच संघटनपातळीच्या मानसिकतेत कोणी संपुर्ण समाज एकापटवार यावा या मानसिकतेत कोणी एकला चलोरेच्या भुमिकेतील मानसिकतेत तर कोणी समाजपटलावर वितुष्ट निर्माण होण्यापरीच्या किंवा निर्माण करण्याच्या मानसिकतेत आज दिसुन येत आहेत *समाज एक व्हावा समाजाने एकरुपतेच्या सर्वोच्च ठिकाणाहुन आपल्या हक्काचा आवाज एकञ करावा. आम्ही एक आहोत आमच्या एकतेच्या अधिकाराच्या आड येणा-या बाबीवर एकतेतुनच कार्य करावे ही मानसिकता बाळगुन ज्यांनी ज्यांनी समाजस्तरावर आज पर्यंत जंग जंग पछाडले,समाज एकतेची मशाल पेटविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी स्वत:च्या घराचा,कार्यरत आपल्या सेवेचा त्याग केला,वेळ पैसा श्रम बरबाद करुन सामाजिक सेवेचे व्रतरुपी कार्य केले,त्यांचा अपमान हा श्रेयवादाच्या मानसिकतेतुन आज राज्यातील समाजस्तरावर दिसुन येत आहे आणि हा श्रेयवाद म्हणजे आमच्याच समाजघटकास कमी लेखण्याचा काही ठिकाणी शिक्षित सुशिक्षित मंडळीकडून करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दिसत आहे आणि ही वृत्ती समाजस्तरासाठी फार मोठी हानि होण्याची किंबहुना समाजस्तर अधोगतीला जाण्याचा संकेत देत आहे.* आज आमचा समाजघटक जो विविध उपजमातीत राज्यात विभागला गेला आहे हाच समाजघटक आपल्या एकरुपतेतुन आपल्या हक्कासाठी एकञ लढा उभा करत असेल तर त्यासाठी आपण ही प्रयत्नरत राहणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. आम्ही राज्यात भोई, कहार, झिंगाभोई परदेशीभोई राजभोई कहारगोडीया किरात मछुआ मांझी जतिआ केवट ढीवर धीवर धीमर पालेवार मच्छिंद्रभोई नावाडीभोई मल्हार मल्हाव मल्हाह बोई नावाडीतारु खाडीभोई गाढवभोई खारेभोई ढेवरा भनारा-भनारी-भनारे निषाद मल्ला मल्हाव मल्हारभोई नाविकभोई ओडेवार ओडेलु बेस्तार-बेस्ता या नावामध्ये आपले जीवनमान व्यतित करतांना दिसत आहोत आणि हो आम्ही राज्यातील एकच आहोत. आमच्या जमाती सरकार समोर ह्या एकच... म्हणून आपल्या सामाजिक हक्कासाठी एकाच स्तरावर येणं महत्त्वाचे किंबहुना आज ते गरजेचे आहे ..!!! अनेक पातळीवरुन आम्हाला समाज बांधवात समाज भगिनीत बेकीकरण्याचा प्रयत्न होतांना दिसतो आहे. ही बेकीची संस्कृती जोपासण्याचा ज्यांच्याकडून प्रयत्न केला जात असेल तर ती मंडळी कोणत्या मानसिकतेत आहेत? समाजस्तरावर असत्य बाबी होत असतील तर त्यावर विचार झालाच पाहीजे; परंतु त्याला काही सामाजिक अनुष्ठान आहेत काही परिमाण आहेत काही सामाजिक नियम आहेत आणि त्याचा विचार करुन त्यावर कार्य व्हावा.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा