Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

आर्वी मधे महिला बचत गटांना मार्गदर्शन





प्रतिनिधी निखिल राजपूत पुणे:आर्वी - येथील ग्राम पंचायत कार्यालया समोर 'ग्रामीण कृषि कार्यानुभव' कार्यक्रमा अंतर्गत कृषि महाविद्यालय पुणे येथून आलेल्या कृषिदूतांनी 'महालक्ष्मी' बचत गटातील महिलांना घरगुती पद्धतीने दुधपासुन पनीर बनवायला शिकवले. " बचत गटांमार्फत बाजारात मागणी असलेले असे दुग्ध पदार्थ बनवल्यास बचत गटांना फायदा होऊ शकतो तसेच महिलांना स्वयं रोजगार देखील उपलब्ध होऊ शकतो" असे महिला बचत गट अध्यक्ष सौ. विजया डोंगरे यावेळी म्हणल्या. सुमारे ३० महिला ह्यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी शुभम करपे, आकाश साबळे, ऋषीकेश काळे, राघव रेड्डी व गौरव पाटील या कृषि दूतांनी मार्गदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध