Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९
शिरीष चौधरी काॅग्रेस उमेदवार यांचा उद्या प्रचार नारळ खंडोबाच्या साक्षीने. ..
प्रतिनिधी अजीज शेख :रावेर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मा. शिरीष मधुकरराव चौधरी यांचे उद्या दि ६ रोजी सकाळी ९ वाजता फैजपूर येथील खंडोबा देवस्थान येथे प्रचारचे नारळ वाहून प्रचाराला प्रारंभ होणार आहे
प्रचार नारळ प्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी,काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील,माजी खा डॉ उल्हास पाटील, माजी आमदार रमेशदादा चौधरी, माजी आमदार अरुण पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे प्रचार प्रारंभी प्रचार दौरा असा राहणार आहे दुपारी ३ ते ३.५० आमोदा दुपारी ३.४५ ते ४.४५ बामणोद ,सायंकाळी ५ ते ५.३० कोसगाव, सायंकाळी ५.४५ ते ७ प्रचार फेरी निघेल प्रचार नारळ व वरील गावात काढण्यात येणाऱ्या प्रचार फेरीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, रावेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुका अध्यक्ष नीलकंठ चौधरी तसेच पी आर पी कवाडे गट रावेर व यावल तालुका अध्यक्ष तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी यांनी केले आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा