Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १९ जानेवारी, २०२०

शिरपूर तालुका भोई समाजाच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार भाऊ रंधे यांचा सत्कार





शिरपूर:प्रतिनिधी:महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या जि.प. निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बहुमत मिळालेल्या धुळे जिल्ह्याच्या जि.प. अध्यक्षपदावर दिग्गजांची नावे समोर आले असतांना शिरपूर तालुक्यातील केलेला विकास व निवडून आलेल्या सदस्यांची संख्या विचारात घेता. 
तसेच मा. शिक्षणमंत्री अमरीश भाई पटेल यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे बिनविरोध शिरपूर तालुक्याच्या वाट्याला आल्याने मतदार राजा मोठे समाधान व्यक्त करीत आहे. 

याप्रसंगाचे औचित्य साधून कर्मवीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यालयात डॉ. तुषार भाऊ रंधे यांचा शिरपूर तालुका भोई समाज अध्यक्ष श्री सुभाष सुकलाल भोई व शिरपूर तालुका भोई समाज आदर्श विकास मंडळाच्या वतीने सत्कार केला. 

याप्रसंगी श्री.सी.एम.भोई सर श्री.भाईदास मोरे  श्री. दंगल मास्तर,श्री.गुलाब नाना, श्री. रवींद्र सोनवणे, श्री. प्रा.डाॅ .राजेंद्र वाडीले, श्री.भोजराज ढोले,श्री. दिलीप ढोले .तरुण गर्जना वृत्तपत्राचे मुख्य संपादक श्री. संतोष भोई उपस्थित होते. 

रंधे परिवाराचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून तालुक्यासाठी मोठे योगदान लाभलेले आहे. 

गोरगरिबांच्या, आपत्ती ग्रस्त लोकांच्या सतत सेवेत तत्पर असलेल्या रंधे परिवाराला तालुक्यातील नाही तर धुळे जिल्ह्यातील जनतेच्या सेवेची संधी मिळाली त्या बद्दल संपुर्ण तालुक्याला आनंद झालेला आहे.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अध्यक्षांना विश्वास दिला की भोई समाज सदैव रंधे परिवाराच्या पाठीशी राहील.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध