Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०
मच्छीमार संस्था सभासदाना गृह उपयोगी साहित्याचे वाटप
नागपूर: प्रतिनिधी:विदर्भातील सिर्सी-उमरेड परिसरातील पवन मच्छीमार सहकारी संस्था आणि सिर्सी नाला मच्छीमार सहकारी संस्थांतर्फे वार्षिक सामाजिक स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय प्रमुख मच्छिमार सहकारी संस्था प्रकोष्ठ-सहकार भारतीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य मच्छिमार सहकारी संघ,मुंबईचे संचालक मा प्रकाशजी लोणारेसाहेब उपस्थित होते.
त्यांच्या हस्ते परिसरातील मच्छिमार सहकारी सोसायटीतील सदस्य यांना गृहोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
या सामाजिक कार्याच्या प्रसंगी मा प्रकाशजी लोणारेसाहेब यांनी राज्यातील सहकारी चळवळीचे मूल्य आणि त्याचे महत्त्व संबंधितांना समजाऊन सांगितले. यावेळी संस्था अध्यक्ष श्री रमेश शेंडे, किशोर मेश्राम यांचे सह मच्छिमार बंधु भगिनी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- दिंडोरी ( वणी ) : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर परिसर जलमय झाला. मंदिरात पुराचे प...
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा