संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :-
१२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोजी फिर्यादी फकीरचंद उर्फ मनिष शामसिंग महेर वय-२९, रा. मूळ पेंढापूर, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर, सध्या अजबनगर, क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली की, वेळ-रात्री सुमारे ०९.३० वाजेच्या सुमारास सिडको ब्रिज ते क्रांतीचौकाकडे रिक्षाने घरी जात असताना सेव्हन हिल ब्रिजखाली महानगरपालिका बसस्टॉपजवळ मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी रिक्षा अडवून जबरदस्तीने फिर्यादीस खाली उतरविले, लगेच पाठीमागुन काळ्या रंगाची महिंद्रा थार कार मधुन आलेल्या उदय मोतीलाल मरमट उर्फ राजपूत, जावेद अमिन शेख, अनस अय्युब चाऊस, गुड्डू अय्युब शेख यांनी फिर्यादीला जबरदस्तीने वाहनात बसवून देवगाव रंगारी येथे नेवुन फिर्यादी व आरोपीतांमध्ये ३० ते ४० ट्रक वाळु परस्पर विकणे व त्यामधुन मिळणारे कमिशन फिर्यादीस न मिळाल्याने फिर्यादी व आरोपीतांमध्ये शिवीगाळ होत वाद झाल्याने त्याचा मनात राग धरुन वरिल नमुद आरोपीतांनी फिर्यादीस बळजबरीने लाकडी दांड्याने लाथाबुक्क्यांनी मारहान करत फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरन करत महिंद्रा थार गाडीमध्ये टाकुन देवगाव रंगारी येथील एका जुन्या बंगल्या समोरील मोकळ्या जागेत नेऊन मारहाण, व कपडे फाडून मोबाईलवर त्यांचा व्हिडिओ चित्रित करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याच्या तक्रारीवरुन फिर्यादीने पोस्टे जवाहरनगर गुरनं-३०२/२०2६ कलम-१२६ (२), १४०(२),१४०(४),११५(२),३५२,३५१(२),३(५). भा. न्या. संहिता प्रमाणे गुन्हा दाखल केला.सदरच्या घटनेची माहीती मिळताच वरिष्ठांच्या आदेशाने तात्काळ पोनि सचिन कुंभार, गुन्हे शाखेची टिम, असे घटणास्थळावर जावुन अधिकची माहीती घेत तात्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरवत जवाहरनगर पोलीसांनी संयुक्त कारवाई करत गुन्हे शाखेच्या, व देवगाव रंगारी सपोनि गोरे साहेब, व पोलीस स्टफच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू घेत. देवगाव रंगारी ता कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. येथे सदर प्रकरणातील आरोपी नाव (२) जाफर उर्फ गुड्ड आयुब शेख वय-३३ वर्ष धंदा ज्युस सेंटर, (२) जावेद अमिन शेख वय-20 वर्ष, धंदा-चालक (३) अनस आयुब चाऊस वय १८ वर्ष, धंदा चिकन दुकान, सर्व राहणार देवगाव रंगारी ता. कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर व काळ्या रंगाची महिंद्रा थार गाडीसह ताब्यात घेतले. तर फरार आरोपी नाव-उदय मरमट उर्फ राजपुत रा. झोलेगाव फाटा ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर व दोन अनोळखी साथीदार आरोपी फरार नाव पत्ता माहीती नाही.सदरची कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार ,पोलीस उपआयुक्त परिमंडळ- रत्नाकर नवले सहाय्यक पो. आयुक्त मनिष कल्याणकर उस्मानपुरा विभाग, गुन्हे शाखा वरिष्ठ पोनि गजानन कल्याणकर, वरिष्ठ पोनि अशोक भंडारे साहेब, आर्थीक गुन्हे शाखा, जवाहरनगर वरिष्ट पोनि सचिन कुंभार साहेब, पोस्टे देवगाव रंगारी प्रभारी सपोनि गोरे , यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनी गादेकर, पोह/१४१५ साळुंके, पोह/१०५४ गुप्ता पोह / श्रीकांत काळे, चालक पोह/ शिंगारे, पोह/देगलुर, पोह/काळे, पोअं/मारोती गोरे, पोअं/चव्हाण पोअं/त्रिभुवन यांनी उत्कृष्ट कामगीरी केली आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा