Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
ऐनपूर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचा समारोप. मराठी भाषा विचारातून आचरणात आणणे गरजेचे:- प्राचार्य डॉ.जे.बी अंजने.
ऐनपूर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचा समारोप. मराठी भाषा विचारातून आचरणात आणणे गरजेचे:- प्राचार्य डॉ.जे.बी अंजने.
रावेर:प्रतिनिधी:रावेर तालुक्यातील
निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथून जवळच ऐनपूर येथिल सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात १५ जानेवारीला मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचा समारोप करण्यात आला.
१ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान मराठी भाषेचा प्रचार व प्रसार महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात करण्यात येऊन वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. त्यात ग्रंथ दिंडी काढून मराठीतील वेगवेगळ्या ग्रंथांची ओळख करून देण्यात आली.
३ जानेवारीला सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करून त्यांचे शिक्षण व मराठी भाषेतील योगदान स्पष्ट करून महात्मा फुलेंच्या शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगीरी आदि मराठी साहीत्याची माहीती देण्यात आली. निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, काव्य वाचन, नाट्य वाचन, राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रीय युवक दिन अशा विविध कार्यक्रमांचे मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्या निमित्त आयोजन करण्यात आले. मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याच्या समारोप प्रसंगी अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. जे.बी अंजने हे होते.
मराठी भाषा विचारातून आचरणात आणणे गरजेचे आहे असे मत त्यांनी मांडले. त्यांनी वाचाल तरच टीकाल मराठी हि सर्वश्रेष्ट भाषा आहे. मराठी भाषे बरोबर मराठी शाळेचेही संर्वधन होणे गरजेचे आहे. प्रत्येक इंग्लीश मेडीयम स्कुल मध्ये मराठी विषय अनिवार्य असली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रा.एम.के सोनवणे यांनी मराठी भाषा संवर्धनाची गरज आहे असे त्यांनी पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.दिलीप सोनवणे यांनी केले तर सुत्रसंचालन आफताब खान या विद्यार्थ्यांने केले तर आभार प्रशिक तायडे या विद्यार्थ्यांने मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सौ.रेखा पाटील, प्राध्यापक व प्राध्यापिकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते.
फोटोत मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ. जे.बी.अंजने व्यासपीठावर प्रा.दिलीप सोनवणे, प्रा.डॉ.सौ.रेखा पाटील, उपप्राचार्य डॉ. जे.बी.अंजने, प्रा.एम.के.सोनवणे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- दिंडोरी ( वणी ) : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर परिसर जलमय झाला. मंदिरात पुराचे प...
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा