Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
अमरिशभाई पटेल सीबीएसई स्कूलचा विद्यार्थी विवेक माळी याची पंतप्रधान मोदीं सोबत 'परिक्षा पे चर्चा' कार्यक्रमासाठी झाली निवड, प्रतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत प्रत्यक्ष होणार सुसंवाद.
अमरिशभाई पटेल सीबीएसई स्कूलचा विद्यार्थी विवेक माळी याची पंतप्रधान मोदीं सोबत 'परिक्षा पे चर्चा' कार्यक्रमासाठी झाली निवड, प्रतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत प्रत्यक्ष होणार सुसंवाद.
शिरपूर:प्रतिनिधी:दि शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित अमरिशभाई आर. पटेल सीबीएसई स्कूल मधील दहावीचा विद्यार्थी विवेक अविनाश माळी याची 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमासाठी निवड झाली असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याशी प्रत्यक्ष सुसंवाद साधण्याची संधी प्राप्त झाली आहे.
विद्यालयासाठी व शिरपूर तालुक्यासाठी गौरवास्पद बाब आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोजक्याच विद्यार्थ्यांची निवड या कार्यक्रमासाठी झाली असून खान्देशातून फक्त या एकमेव विद्यार्थ्याची निवड झाली आहे.
परिक्षेविषयी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते. ही भीती दूर व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन करीत आहेत. या वर्षीदेखील नवी दिल्ली येथे दि. २० जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधणार आहेत.
यासाठी विशेष ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली होती. या परीक्षेत विद्यार्थ्यांना दिलेल्या पाच विषयांवर आपले स्वतःचे मनोगत मांडायचे होते व प्रश्न विचारायचा होता. त्या प्रश्नाचे महत्व लक्षात घेऊन ही निवड होते.
या स्पर्धेत विवेक अविनाश माळी याची निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यास शाळेचे प्राचार्य निश्चल नायर, विषय शिक्षक निलेश चोपडे, महेश पिसू, वाहिद शेख यांचे मार्गदर्शन लाभले. दि. १७ जानेवारी रोजी विवेक माळी हा निलेश चोपडे यांच्यासह नवी दिल्ली येथे रवाना होणार आहे.
त्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, उद्योगपती तपनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, सीईओ डॉ. उमेश शर्मा, शिक्षण विस्तार अधिकारी साळुंखे, प्राचार्य निश्चल नायर, प्राचार्य दिनेश राणा, केंद्रप्रमुख बाविस्कर, उपप्रचार्या सौ. अनिता थॉमस यांनी कौतुक केले. तसेच सर्वांनी पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा