Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०

‘चोपडा महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ‘सारी डे’ चे आयोजन’




चोपडा:प्रतिनिधी:येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दि. १६ जानेवारी २०२० रोजी सकाळी १०.०० वाजता ‘सारी डे’ चे आयोजन करण्यात आलेले होते. 
या कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने करण्यात आली. या कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेच्या उपाध्यक्षा ताईसाहेब मा.सौ.आशाताई विजय पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व कै.ना.आक्कासो. सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दिपप्रज्वलन करून करण्यात आले. 

या कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील, संस्थेचे अध्यक्ष मा.भैय्यासाहेब अॅड.संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव ताईसाहेब डॉ.सौ.स्मिता संदीप पाटील यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे, प्रमुख वक्त्या प्राध्यापिका सौ.पूनम महाजन (माजी विद्यार्थीनी, धानोरा), प्रमुख पाहुणे श्रीमती ज्योती पाटील, ऑक्सफर्ड स्कूलच्या प्राचार्या सौ.रेखा पाटील तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी श्री.व्ही.पी.हौसे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा श्रीमती एम.टी.शिंदे यांनी केले. 

या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थिनींनी विविध कलागुण व फॅशन शो, म्हणी, उखाणे, हास्यविनोद, लग्नाची गाणी, सुख-दुख व्यक्त करणाऱ्या जात्यावरच्या ओव्या ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. 

यावेळी प्रमुख वक्त्या प्राध्यापिका सौ. पूनम महाजन आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या की,भारतीय संस्कृतीमध्ये साडी चे महत्व अनन्यसाधारण आहे. या साडीमुळे भारतीय संस्कृतीची ओळख घडते. साडी हे भारतीय व महाष्ट्रीयन स्रियांच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. यावेळी त्यांनी साडी चे महत्व पटवून दिले. 

या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, महाविद्यालयातील विद्यार्थीनीना व्यासपीठ निर्माण व्हावे तसेच या माध्यमातून विद्यार्थीनीमधील कलागुण विकसित व्हावे, आपली संस्कृती जोपासली जावी या उद्देशाने आयोजित केलेला हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अनिता लांडगे व उज्वला पाटील यांनी केले तर आभार सौ.टी.एस.पिंजारी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्धी प्रमुख श्री.संदीप बी.पाटील व श्री.भूषण पवार, श्री.प्रदीप बाविस्कर, श्री.हनुमंत पाटील व पवन सोनवणे यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थीनी, प्राध्यापक बंधू-भगिनी व शिक्षकेत्तर बंधू-भगिनी कर्मचारी उपस्थित होते.

*****************************
ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल चोपडा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन
*****************************



यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल चोपडा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील दंतवैद,डॉ. वाल्मिक पाटील बालरोगतज्ज्ञ, डॉ. तृप्ती पाटील नेत्ररोगतज्ज्ञ आणि शाळेच्या प्राचार्या मिस परमेश्वरी मॅडम उपस्थित होते. 


आरोग्य शिबिरात प्रत्येक विद्यार्थ्याचे संपूर्ण शारीरिक तपासणी करण्यात आली,ज्या विद्यार्थ्यांना काही शारीरिक अडचण होत्या अशा सर्वांना उपस्थित डॉक्टरांनी मार्गदर्शन केले,या शिबिरात  डॉ राहुल पाटील यांनी दंत व मुखरोग तपासणी, डॉ वाल्मिक पाटील यांनी सर्वांगीण तपासणी व डॉ तृप्ती पाटील यांनी नेत्र तपासणी केली

यावेळी डॉ. वाल्मिक पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आरोग्याची काळजी कशा पध्दतीने घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन केले,डॉ. राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना अती चॉकलेट आणि जास्त गोड पदार्थ खाल्याने आपल्या दातांवर काय परिणाम होतात हे सांगितले तसेच डॉ. तृप्ती पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अती वापरामुळे आपल्या डोळांवर काय परिणाम होतात यासंदर्भात माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध