Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ जानेवारी, २०२०

पत्रकार दिनी सुशिलदादाची प्रबोधनवाणी ; श्रोते मंत्रमुग्ध शेगाव पत्रकार संघाचे आयोजन



शेगाव:प्रतिनिधी:शेगाव पत्रकार संघाचे वतीने पत्रकार दिनी सुशिलदादाची प्रबोधनवाणी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेली. सुशिल महाराज वणवै यांनी राष्ट्रीय कीर्तनातून समाज प्रबोधन.
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची तोफ सुशील महाराज वणवे यांच्या वा णीतुन "सुशील दादाची प्रबोधन वाणी" या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाच्या आधारे "समय को मत गमा वोजी! समय अनमोल होता है! या भजना द्वारे सादरीकरण करण्यात आले. माणसाच्या जीवनात वेळेला फार महत्त्व आहे. त्याची कदर करा जीवनाचा शेवटचा श्वास कधी संपेल सांगता येत नाही. त्यामुळे मानवी जीवनाचा पेपर आपण योग्य सोडवत आहोत का याची तपासणी स्वतः करावी. व्यसनात वेळ देऊन तरुण जीवन नष्ट करीत आहे. थोर महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करताना त्यांचे विचार बाजूला ठेवून तरुण फक्त जयंती च्या नावावर व्यसन करून नाचत आहे. दारू पिणाऱ्याला फक्त निमित्त पाहिजे, दिवसभर माणूस चांगला राहतो संध्याकाळ झाली ही बारवर दिसतो. राष्ट्रसंत म्हणतात जबतू ने किसे जीता, है तबतू शराब पिताहै! ग्रामगीतेत राष्ट्रसंतांनी महिलोन्नती अध्याय लिहिला. आपण खरंच महिलेला सन्मान व सुरक्षा देत आहोत का? जिच्या हाती पाळण्याची दोरी! तीच जगाते उध्दरी! अशी वर्णिली थोरवी! शेकडो गुरुहूनी! संतांनी महिलेला गुरुस्थानी मानले आपण केव्हा मानणार? आपल्याला चांगलं जीवन जगायचं असेल तर मुहूर्त पाहण्याची गरज नाही. संत कबीरदास म्हणतात कल करे सो आज कर! आज करे सो अब! समय निकल जायेगा! फिर करोगे कब! ज्या संत साधू व थोर महापुरुषांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, समाजाने त्यांची जात धर्म पक्ष पंथ किंवा रंग-रूप कधीच पाहिले नाही. त्यांनी समाजासाठी काम केले हीच ओळख त्यांची महत्त्वाची ठरली. आद्य पत्रकार श्री बाळशास्त्री जांभेकर यांनी त्यांच्या कार्यातून समाज घडविला. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात जाती-पाती का भेद हटाकर, सबके दिन चमकावो,आवो सुंदर देश बनाओ!! एक दिवस जगाचा निरोप घ्यायचा आहे तेव्हा अत्यं यात्रेत घरची रडतील त्यात काही नवल नाही, आपल्या घरचे सोडून किती रडतात  याला महत्व आहे. विधाता मृत्यू हो ऐसी! हजारो लोग रोते हो!! या प्रमाणे जीवनाचा पेपर सोडवावा. विनोदातून प्रबोधन अशा माध्यमाने सुशील महाराज वणवे यांनी कार्यक्रम सादर केला. शेगाव पत्रकार संघाच्या कार्या बद्दल मन भरून शुभेच्छा यावेळेस गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिल्या सुंदर नियोजन कार्यक्रमाचे करण्यात आले होते. वरील कार्यक्रमाकरिता तबला नितीन इंगळे, हार्मोनियम कुंदन इंगोले सर, ऑर्गन सिद्धेश्वर टिकार सर, ॲक्टो पॅड ज्ञानेश्वर धनभर, खंजरी सुखदेवराव इंगोले, गायन संतोषराव वसतकार, साथ-संगत प्रमोद पोहरे व सेवा मंडळाचे सर्व सदस्यांनी साथ दिली. शेवटी "तन-मन-धन असे सदा सुखी हो भारत देश हमारा" या राष्ट्र वंदनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.राष्ट्रीय किर्तनकार सुशिल महाराज वणवे यांचा अनिल उंबरकार व सहकार्यांची सत्कार केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य अनिल उंबरकार,शेगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश महाजन, सचिव अमर बोरसे,नंदु कुळकर्णी, ज्ञानेश्वर कुकडे, सचिन कडूकार,देवचंद समदूर,बळीराम हिंगणे,दिनेश घाटोळ, संतोष पिंगळे,उमेश राजगुरे, आनंद जवंजाळ,संगितराव उन्हाळे  आदींनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध