Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध मटक्याचा सुळसुळाट; कारवाईची नागरिकांची मागणी .

      

वणी (प्रतिनिधी): वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध मटका व्यवसाय पुन्हा डोके वर काढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. वणी शहरासह चिंचखेड,माळेदुमाला, कापाची करंजी, कोशिंबे, भनवड,तसेच परिसरातील विविध भागांत छुप्या पद्धतीने मोबाईल वरून खुलेआम मटका घेतला जात असल्याचे आरोप होत असून, यामुळे युवकांमध्ये जुगाराचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठिकाणी अवैध मटका सुरू असल्याची माहिती असूनही प्रभावी कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. कारवाई सोडून मटका व्यावसायिक यांची पाठराखण केली जाते का असा सवाल नागरिकांकडून येत आहे या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होण्याबरोबरच अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
 अवैध जुगार व्यवसायाला आळा घालण्यासाठी संबंधित पोलीस प्रशासनाने तातडीने छापेमारी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच अशा प्रकारांना कायमस्वरूपी प्रतिबंध घालावा, यावर पोलीस अधीक्षक ठोस पाऊले उचलून कारवाई करतील का अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध