Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १९ जानेवारी, २०२०
देवा तुला कस रे सांगु समजुन......!
(प्रतिनिधी)
लेखक:लक्ष्मण गंगाधर वाल्डे पिशोरकर
देवा तुला कस रे सांगु समजुन......,
गरिबांच्या घामांचा कधी फिटेलरे पांग......!
घामा सोबत झिंझत चालल मास....,
उरले नुसते हाड...!
स्वःता च्या जिवाच्या क्षणिक सुखासाठी ....,
कुठली धरु रे वाट.......!
वाट विचारायला तुला., सांग भेटु कोठे आता.....!
सांग देवा मला ..., तुला भेटु कुठे आता.....!
कष्टाने कमवलेल्या भाकरी ने ....,
टीचभर पोट का भरत नाही...!
घामाने कमवलेल्या पैशातुन ...,
आयुष्य का ? सजत नाही....!
राबराब राबुन मागे काहीच का?
शिल्लक उरत नाही.....!
गरिबी ची व्यथा देवा..,
तुला कशी सांगु समजुन...!
अहंकारीनच्या घरात तु...,
सदैव वास करतो...!
गरिब बिचारा ..,
न चुकता दोन वेळा तुझी दिवाबत्ती करतो.
तरि तु त्याच्या वर का ? फुगुन बसतो.....!
हा भेद वैर चा कसा....?
अत्याचारीनच्या घरात रोज मोतीयांचा घास....,
आमच्या गरिब कष्ट करी बापाच्या .......,
लेकरांना का करावा लागतो उपवास...!
गरिब माझी माय नि बाप ...,
पाई करतात तुझी वारी......!
त्यांचे खिशे होतात खाली.....!
जो दिसत नाही तुझ्या दारि ......,
त्यांच्या घरात माल मावत नाही....!
तुझ्या नावाचा गजर जो करतो....,
तो मरणाच्या दारेला का भिडतो...!
ज्यांची गल्लीच्छ वाणी...,
त्यांना स्वर्ग अपसरा का.? पाजे पाणी...!
देवा का रे भेद हा .......,
तुला अजुन कसा कळला नाही.......!
देवा ह्या गरिबांच्या जिवाची मरमर....,
केव्हा रे संपुष्टात येईल.....!
स्वःता च्या सुखा साठी त्यांना केव्हा रे जगता येईल.....!
देवा तुला कशी रे सांगु समजुन ...,
व्यथा माझ्या -आमच्या गरिब बापाच्या जिवणाची......!
सांग देवा , क्षणिक सुखासाठी कुठली धरुरे वाट.....!
माझ्या कष्टाच्या घामांचा कधी फिटेलरे पांग.......!
-------------------------लक्ष्मण गंगाधर वाल्डे-पिशोरकर .
मो.नं-8888606068 .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा