Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ९ फेब्रुवारी, २०२०
राज्यात भोई तत्सम जमाती एका ठिकाणी येण्यासाठी प्रयत्न करु या।।
श्रीअर्जुनभोई मुंबई:राज्यातील समाजपातळीवर अनेक वर्षांपासून काही समाज सेवक समाजसेवा रुपी कार्य नित्यनियमाने करतांना दिसत आहेत तर आमच्यातीलच काही समाजसेवेच्या नावाने आमचेच सामाजिक मारेकरी म्हणून भुतकाळात उदयास आलेले होते आणि आज ही वर्तमान काळात उदयास येतांना दिसत आहेत.
समाजातील एखादा समाजसेवी समाजसेवेचे चांगले आणि निःस्वार्थ काम करत असेल तर त्याच्या पंखाला जरुर जरुर बळ द्या. काही चुकत असेल तर त्याला एकांतात समाजावून सांगा पण त्याची जाहीर बदनामी तरी करु नका. आधी सत्यता पडताळून पहा. आपल्याकडून कुणाचे चांगले होत असेल तर नक्कीच मदत करा किंबहुना तसा प्रयत्न करत रहा परंतु काही करायचे नसेल तर कमीतकमी समोरच्याच्या करणा-याच्या कार्याची बदनामी तरी करु नका. समाज सेवकांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणे, खेकडारूपी प्रवृत्तिला कायमची मूठमाती देणे, समाजहितासाठी एकमेकांची कायम पाठराखण करणे, समाजहितातेच किंबहुना समाज जोडण्याचे कार्य करत राहणे हे आमच्यासाठी खुप मोलाचे कार्य ठरेल... राज्यातील आमचा भोई तत्सम समाज खूप मोठा आहे. राज्यात आम्ही भोई म्हणून... कहारभोई झिंगाभोई परदेशीभोई राजभोई कहारगोडीया किरात मछुआ मांझी जतिआ केवट ढीवर धीवर धीमर पालेवार मच्छिंद्र नावाडीभोई मल्हार मल्हाव मल्लाव बोई नावाडी नावाडीतारु खाडीभोई गाढवभोई खारेभोई ढेवरा भनारा-भनारी-भनारे निषाद मल्ला मल्हारभोई नाविकभोई ओडेवार ओडेलु बेस्तार-बेस्ता या जमाती शासनदरबारी अंकीत आहोत. मिञहो, आपल्याला समाज जोडो अभियानाच्या चांगल्या कामासाठी वेळ लागणार... त्यात अनंत अडचणी ही येणार... पण येणा-या पिढीसाठी नक्कीच आम्ही एक आदर्श भोई तत्सम समाज घडवणार... यात तिळमाञ शंका नाही. परंतु यासाठी सामाजिक पातळीवरुन सामुदायिक प्रयत्न होणे हेही तितकेच गरजेचे आहे. जो समाजहितासाठी चांगले काम करेल, एकमेकांना सहकार्य करून समाजहितासाठी ठामपणे उभा राहील आणि इतरांनाही उभा करेल त्यांना समाज आपल्या डोक्यावर निश्चित घेतल्या शिवाय राहणार नाही.
समाजाला बळ देणे हीच खरी मानवंदना आमच्या भुतकाळातील कालकथीत समाजसेवकांना ठरेल...!!! मित्र हो, समाज पातळीवर मतभेद असावेत परंतु मनभेद तरी नकोच नको... म्हणून राज्यात भोई तत्सम जमातीघटक एकञ करण्यासाठी संपूर्ण राज्यातुन समाजजोडो अभियान राबविण्यात पुढाकार घेऊ या... आणि आमच्यातील आमचेच काही सामाजिक मारेकरी यांच्या समाज विघातक वृत्तीला नष्ट तरी करु या।।
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा