Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२०

भाजपा धुळे तालुकाध्यक्षपदी: देवेंद्र पाटील



धुळे (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी धुळे तालुकाध्यक्षपदी देवेंद्र आण्णा पाटील (कुंडाणे-वेल्हाणे) यांची बिनविरोध निवड जाहिर करण्यात आली आहे.भारतीय जनता पार्टी धुळे तालुकाध्यक्षपदासाठी येथील कोतवाल भवन येथे दि. 9/2/2020 रोजी निवडणुक घेण्यात आली होती. भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा प्रमुख उपस्थित धुळे तालुकाध्यक्षपदासाठी एकुण सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने देवेंद्र पाटील यांची बिनविरोध धुळे तालुकाध्यक्ष म्हणुन निवडणुक निर्णय अधिकारी कामराज निकम यांनी जाहिर केले.

देवेंद्र पाटील यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री तथा खा. डाॅ. सुभाष भामरे, महाराष्टाचे माजी मंत्री जयकुमार रावळ, भाजपा उत्तर महा. विभाग संघटन मंत्री अॅड. किशोर काळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे कृउबा समिती अध्यक्ष सुभाष देवरे आदिंनी अभिनंदन केले.

निवड प्रसंगी माजी जिप अध्यक्ष मनोहर भदाणे, मा. प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, जिल्हा संघटन सरचिटणीस किशोर सिंघवी, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जि. प. कृषी सभापती बापु खलाणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले, जिल्हा परिषद सदस्य प्रा. अरविंद्र जाधव, संग्राम पाटील, आशुतोष पाटील, धुळे पं. स. सभापती विजय पाटील, उपसभापती विद्याधर पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जयदिप बागुल, भाजपा तालुका सरचिटणीस ज्ञानेश्वर चौधरी, शाम बडगुजर आदि उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध