Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ९ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
तिर्थक्षेत्री अपराध होणार नाही याची काळजी घ्यावी. मंदीर निर्माण करणे महत्वाचे आहेच त्यासोबत मंदीराची पावित्र्यता राखणेची महत्वाचे आहे. असे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी श्री माता तुळजाभवानी प्राणप्रतिष्ठा व मंदीर जीणोध्दार कार्यक्रमाची सांगता प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
तिर्थक्षेत्री अपराध होणार नाही याची काळजी घ्यावी. मंदीर निर्माण करणे महत्वाचे आहेच त्यासोबत मंदीराची पावित्र्यता राखणेची महत्वाचे आहे. असे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी श्री माता तुळजाभवानी प्राणप्रतिष्ठा व मंदीर जीणोध्दार कार्यक्रमाची सांगता प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
प्रतिनिधी:धार्मिक स्थळी अपराध होणार नाही याची काळजी घ्यावी
मंदीर निर्माणासोबत पावित्र्यता राखणे महत्वाचे महामंडलेश्वर जनदिन हरीजी महाराज इतर ठिकाणी झालेल्या अपराधाचे प्रायचित्त शास्त्रात सांगीतले आहे.
परंतू "तिर्थक्षेत्र कृत पापं वज्रलेपो भविष्यती"या प्रमाणे तिर्थक्षेत्रावर झालेल्या अपराधांचे प्रायचिश्त होत नाही आणि त्याचे कठोर परिणाम साधकाला भोगावे लागतात म्हणून तिर्थक्षेत्री अपराध होणार नाही याची काळजी घ्यावी. मंदीर निर्माण करणे महत्वाचे आहेच त्यासोबत मंदीराची पावित्र्यता राखणेची महत्वाचे आहे. असे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी श्री माता तुळजाभवानी प्राणप्रतिष्ठा व मंदीर जीणोध्दार कार्यक्रमाची सांगता प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज होते. यावेळी आमदार शिरीष चौधरी खा.रक्षा खडसे, यावल पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी,जि.प.उपाध्यक्ष लालचंद
पाटील,नगराध्यक्षा महानंदा होले उपनगराध्यक्ष रशिद तडवी चंद्रशेखर चौधरी, उद्योजक जितेंद्र पवार, रवींद्र होले, भाजपा गटनेते मिलींद वाघुळदे, नगरसेवक हेमराज चौधरी, अनिल नारखेडे, प्राचार्य व्ही आर पाटील, पुरुजीत चौधरी,केतन किरंगे, माजी नगराध्यक्ष चोलदास पाटील, पी.के चौधरी, हिरामण भिरूड पुरुष महिला भाविक भक्तगण यांची उपस्थिती होती.
तिन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाची पूर्णाहुती व महाप्रसादाने शनिवारी सांगता झाली.५००० भाविकांनी घेतला महाप्रसाद. मंदीर व प्राणप्रतिष्ठा निर्माण करीता ज्या दात्यांनी देणगी दिली त्यांचे व परीश्रम घेतलेल्या सर्वाचे समितीने आभार मानले.
सुत्रसंचालन प्रिती चौधरी व आभार युवराज लोधी यांनी मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा