Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०
सावळदे शाळेत विज्ञान दिन साजरा
कुरखळी प्रतिनिधी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळदे येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम डॉ अब्दुल कलाम यांना अभिवादन करून शिक्षिका नम्रता पाटील यांनी कलाम यांच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.
या नंतर विद्यार्थ्यांनी पाण्याची घनता, पाण्याच्या घनतेचा परिणाम, चुंबकत्व, पाण्यात विरघळणारे पदार्थ व न विरघळणारे पदार्थ, पारदर्शक व अपारदर्शक पदार्थ ज्वलनासाठी ऑक्सिजन ची गरज असते, पाण्यातील चुंबकीय परिणाम, हवेचा दाब आणि हवा जागा व्यापते या विषयांवर 10 ते 12 सहज सोप्या प्रयोगांची मांडणी केली व त्यामागील वैज्ञानिक तत्व जाणून व समजून घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक संजय तमखाने, श्रीमती सुवर्णा पाटील, श्रीमती मनीषा जगताप यांनी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा