Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०
संभाजी भिडे यांनी कोरेगाव भीमामध्ये वेगळं वातावरण निर्माण केलं
शरद पवार यांचा पत्रकार परिषदेत घणाघात
मुंबई:प्रतिनिधी:कोरेगाव-भीमा येथे विजय स्तंभाच्या दर्शनासाठी लोक जमा व्हायचे. मात्र स्थानिक आणि बाहेरुन येणाऱ्या लोकांनामध्ये कधीच कटुता निर्माण झालेली नव्हती. मात्र संभाजी भिडे यांनी कोरेगाव-भीमामध्ये वेगळ वातावरण तयार केले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पवार म्हणाले, कोरेगाव-भीमाच्या लढाईमध्ये काही भारतीय ब्रिटिशांच्या बाजूने लढले आहेत. या लढाईमध्ये पेशव्यांचा पराभव झाला हेच वास्तवर आहे. एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा या दोन वेगवेगळया घटना आहेत. एल्गार परिषदेमध्ये 100 पेक्षा जास्त संघटना सहभागी झालेल्या होत्या.
‘कोरेगाव-भीमा येथे गेल्या अनेक वर्षांपासून कार्यक्रम सुरु आहे. दरवर्षी लोक जमतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिथे जाऊन आले. यानंतर तिथे जाणाऱ्यांची संख्या वाढली. मात्र संभाजी भिडे यांनी त्या ठिकाणी एक वेगळे वातावरण निर्माण केलं गेलं. त्यात नक्की काय झालं ते चौकशीत बाहेर येईलच असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- दिंडोरी ( वणी ) : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर परिसर जलमय झाला. मंदिरात पुराचे प...
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा