Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
पाणीपट्टी व प्रॉपर्टी टॅक्स यांचा ८ दिवसांच्या आत कमी कराण्याचा निर्णय न घेतल्यास आमरण उपोषणास बसेल, गजेंद्र महादेव अंपळकर, भाजपा उपाध्यक्ष, धुळे
पाणीपट्टी व प्रॉपर्टी टॅक्स यांचा ८ दिवसांच्या आत कमी कराण्याचा निर्णय न घेतल्यास आमरण उपोषणास बसेल, गजेंद्र महादेव अंपळकर, भाजपा उपाध्यक्ष, धुळे
धुळे:प्रतिनिधी दि. २८/०२/२०२० रोजी भारतीय जनता पार्टी सत्तेत येऊन. १ वर्षे ०२ महिने झाले.आहेत परंतु आजतागायत आमची भाजपाच्या सर्वंच पदाधिकाऱ्यांची लहानापासून ते मोठ्या पर्यंत सर्वांची इच्छा होती कि आपण सत्तेत बसल्यानंतर जनतेला सर्वंच प्रकारच्या सुखसोई वेळेवर देऊ व भाजपाची मान उंचावेल असे कार्य करु. परंतु आयुक्तांसह संबंधीत सर्वंच अधिकाऱ्यांमुळे आज आमची मान खाली जाईल असे घडले आहे.
आज निवडणूक होऊन १ वर्ष २ महिनेचा कालावधी झाला निकाल लागून धुळेकर जनतेने एकतर्फीच भाजपाच्या हातात सत्ता दिली असून जनता खुष झाली आम्हीला ही जनतेने पदावर बसविले म्हणून खुष झालो.पण भाजपा सत्तेत बसल्यानंतर तिन ते चार दिवसांनी येणारे पानी आता ८ ते १० किंवा ११ दिवसांवर गेले यात काय जादू झाली. आम्हाला धुळेकर जनतेला असे वाटले की भाजपा सत्ते मध्ये बसल्या नंतर पाणी एवढे आहे की आपण दररोज पाणी देऊ नाही तसे झाले तर सुरुवातीला एक किंवा दोन दिवसाआड पाणी अशी आमची ईच्छा असतांना असे कुठलेही नियोजन अधिकारी वर्गाने होऊ दिले नाही. आमची ईच्छा व प्रमाणिकपणे प्रयत्न करूनही हे होऊ दिले नाही, याला सर्वस्वी जबाबदार आयुक्त साहेबांसह संबधीत सर्वंच अधिकारी वर्ग आहे.
आता भाजपा सत्तेत बसली त्या तारखेपासून ते दररोज पाणी देईल या तारखेपर्यंत पाण्याच्या टॅक्स जेवढे दिवस पाणी देऊ तेवढ्याच दिवसाचा पाण्याचा टॅक्स लावावा किंवा ३६ ते ४० दिवसांचा टॅक्स लावा नाहीतर दररोज पाणी द्या व पूर्ण वर्षाचा टॅक्स घ्या. आणि प्रॉपर्टी टॅक्सही मनपाच्या सुविधांच्या मानाने खुपच जास्त आहे तो प्रॉपर्टी टॅक्स देखील कमी करण्यात यावा. ह्या दोन्ही गोष्टीवर ८ दिवसाच्या आत निर्णय घेण्यात याव्या ८ दिवसांच्या आत निर्णय न घेतल्यास, मि. आमरण उपोषणास बसेल व यात माझ्या जिवाचे काही कमी जास्त झाल्यास आयुक्तांसह संबंधीत सर्वंच अधिकारीन वर ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात यावा यास सर्वस्वी जबाबदार अधिकारी वर्गच राहील
असे निवेदन म. न. पा. आयुक्त अजिज शेख यांना देण्यात आले आहेत
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...
-
जिवा भावाची मैत्री' या सामाजिक उपक्रमांतर्गत सुरगाणा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलीस निरीक्षक मनोज कुव...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा