Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
आईवडील हे परमेश्वर समान आहेत, त्यांचे उपकार विसरु नका. घरात सर्वाना प्रेम द्या. स्वतःसह सर्वांच्या आरोग्याकडे लक्ष द्या - भुपेशभाई पटेल.,
आईवडील हे परमेश्वर समान आहेत, त्यांचे उपकार विसरु नका. घरात सर्वाना प्रेम द्या. स्वतःसह सर्वांच्या आरोग्याकडे लक्ष द्या - भुपेशभाई पटेल.,
खंबाळे येथे आर. सी. पटेल मेडिकल फाऊंडेशन च्या वतीने अत्याधुनिक 'आरोग्य रक्षक' रुग्णवाहिकेचे लोकार्पण
शिरपूर:प्रतिनिधी:पूर्वी मोळी विकू शाळा शिकू म्हणत, आता झाडे लावा झाडे जगवा ही काळाची गरज झाली आहे. आपल्या मुलामुलींना चांगले शिक्षण द्या. मुंबई व शिरपूर च्या शिक्षण संस्थे मार्फत आम्ही 80 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देतो. पिढी घडविण्याचे काम आम्ही करतोय. शिरपूर शहरात 71 हजार लोकसंख्या पैकी 35 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे. प्राचार्य, शिक्षक चांगली शैक्षणिक सेवा देत आहेत
लोकाभिमुख कामे आपल्याला करायची आहेत. वडीलधारी मंडळीची सेवा करा. रुग्णांसाठी योग्य त्या कमी खर्चात रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे. 700 बेडचे हॉस्पिटल निर्माण करत आहोत. आम्ही काहीतरी देण्यासाठी आलो आहोत, कोणाचे घेण्यासाठी नाही. घरात मोठ्यांचा सन्मान, सेवा करा. आईवडील हे परमेश्वर समान आहेत, त्यांचे उपकार विसरु नका. घरात सर्वाना प्रेम द्या. स्वतःसह सर्वांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्य सेवा पुरविणे आपले कर्तव्य असून प्रत्येकाने व्यसनापासून दूर रहावे. आमच्या 30 - 40 जणांच्या टीम व अनेक पदाधिकारी यांच्या मदतीने तसेच सांगवी येथील वन विभाग, वन्यजीव विभाग मार्फत लोकांना विविध सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्न करणार. सर्वसामान्य नागरिकांनी शासनाच्याविविध योजनांचा लाभ घ्यावा.
विद्यार्थिनींना सायकल भेट देण्यासाठी प्रयत्न करु या.
मुलींना पायावर उभे राहण्यासाठी शिलाई काम व इतर योजनेतून त्यांना सक्षम करू या असे प्रतिपादन शिरपूरचे उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी केले.
महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, शिरपूरचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या प्रयत्नाने तसेच आर. सी. पटेल मेडिकल फाऊंडेशन च्या वतीने अत्याधुनिक 'आरोग्य रक्षक' रुग्णवाहिकेचे लोकार्पण शुक्रवारी दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता खंबाळे ता. शिरपूर येथे भुपेशभाई पटेल यांच्या हस्ते "आरोग्य रक्षक" या रुग्णवाहिकेचे नामकरण व लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा शिरपूरचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी
ईशस्तवन, स्वागत गीत आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय खंबाळे येथील विद्यार्थिनीनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वन्यजीव व प्रादेशिक उपविभाग वन अधिकारी अमितराज जाधव, सामाजिक वनीकरण सहाय्यक वन संरक्षक कालिदास सैंदाणे, सांगवी व शिरपूर वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर शरमाळे, वनपाल शिरपूर नितीन बोरकर, शिरपूर साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, बाजार समिती संचालक हिरालाल पावरा, माजी पंचायत समिती सभापती गिलदार पावरा, जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, जिल्हा परिषद सदस्य कैलास पावरा, पंचायत समिती सदस्य प्रभाबाई कोकणी, पंचायत समिती सदस्य कमलाबाई पावरा, पंचायत समिती सदस्य बागला पावरा, पंचायत समिती सदस्य दिनेश पावरा, शिवपुर मर्चंट बँक चेअरमन प्रसन्न जैन, गोपाल भंडारी, नवनीत राखेचा, जाकीर शेख, विनोद शर्मा, माजी जि प सदस्य प्रेमराज बंजारा, भास्कर बोरसे, बालकीसन पावरा, जोयदा सरपंच गोविंदा पावरा, दिपक पावरा, सुकदेव कोळी, अशोक कोकणी, बाळासाहेब देशमुख, कान्हा चारण, अशोक शर्मा, प्राचार्य आर एफ शिरसाठ व अनेक
मान्यवर उपस्थित होते.
सर्व उपस्थित मान्यवर यांचा सत्कार यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात जयवंत पाडवी म्हणाले, आरोग्य रक्षक रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सुविधा असून ही रुग्णवाहिका खंबाळे परिसरात अनेक गावांच्या सुविधेसाठी कमी खर्चात उपलब्ध भाईंनी केली आहे. आतापर्यंत भाईंच्या प्रयत्नाने मोतिबिंदू शस्त्रक्रिया 17 हजार झाल्या. आरोग्य सेवेसाठी भाई नेहमी तत्पर असतात. अनेक दुर्धर आजार साठी मुंबई, पुणे येथे त्यांच्या मुळे मोफत आरोग्य सेवा पुरविल्या जातात. नारायण सेवा संस्थानला काल 27 रुग्ण यांच्यावर उदयपूर येथे शस्त्रक्रिया यशस्वी होवून आतापर्यंत 117 शस्त्रक्रिया झाल्या.
माहिती वनक्षेत्रपाल कालिदास सैंदाणे यांनी यावेळी विविध योजना बाबत माहिती दिली.वनरक्षक मनोज पाटील यांनी देखील माहिती दिली.
सूत्रसंचालन व्ही. एस. मासरे यांनी केले. आभार जे. पी. पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आर. सी. पटेल मेडिकल फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.
शिरपूर तालुक्यातील गरजू व सर्वसामान्य तसेच सर्व नागरिकांच्या दृष्टीने अत्यावश्यक सेवा म्हणून पटेल परिवाराने गेल्या अनेक वर्षांपासून दोन अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत उपलब्ध केल्या आहेत. शिरपूर शहर व तालुक्याची वाढती लोकसंख्या तसेच इतर गंभीर आजारांची मोठी संख्या लक्षात घेता पुन्हा तालुक्यातील अनेक ठिकाणी रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्याचे पटेल परिवाराने निश्चित केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...
-
जिवा भावाची मैत्री' या सामाजिक उपक्रमांतर्गत सुरगाणा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलीस निरीक्षक मनोज कुव...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा