Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

पोलिसांनो, ड्यूटीवर गंध लावू नका!




शिस्तप्रिय प्रतिमा असलेले तुकाराम मुंढे यांनी नाशिकला आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांनी कार्यालयातील देवतांच्या तसबीरी काढण्याचे परिपत्रक काढले होते. त्याची तेव्हढ्याच तप्तरतेने अंमलबजावणी झाली. त्याची आठवण नुकतेच सहाय्यक आयुक्त तांबे यांच्या पत्राने झाली आहे.  


नाशिक:प्रतिनिधी:कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने ड्युटीवर असताना धर्माचे प्रदर्शन करु नये हा अतिशय जुना शिरस्ता आहे.त्यात पोलिस म्हटल्यावर अधिक तटस्थ व शिस्तप्रिय विभाग मानला जातो. मात्र अनेकदा लोकांमध्ये वावरताना पोलिसांनाच त्याचे विस्मरण होते. त्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल तांबे यांनी त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना लिखित आदेश देत तंबी दिली आहे.  

याबाबत घडले असे की, शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शिवजयंतीचा बंदोबस्त करताना सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना ब्रिफिंग होती. यावेळी सुचना देताना काही अधिकारी, कर्मचारी कपाळावर गंध लावून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समक्ष हजर होते. त्यामुळे सहाय्यक आयुक्त तांबेंनी हे निर्देश दिले. 

पोलीस खात्यासारख्या शिस्तप्रिय खात्यात नोकरीस अअसतांना खात्याच्या शिस्तीबाबत ज्ञान व जाणीव हवी. तरीही पोलीसांनी कपाळावर गंध लावून कर्तव्यावर बंदोबस्त ब्रिफिंग करिता हजर होतात. ही बाब गंभीर स्वरुपाची आहे. हे पोलीस खात्याच्या नावलौकीकास बाधा आणणारे आहे. भविष्यात आपणाकडून अशाप्रकारे कसूर होऊ नये. या करीता सक्त ताकीद देण्यात येत आहे. तसे घडल्यास गंभीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.


1 टिप्पणी:

प्रसिद्ध