Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २८ मार्च, २०२०
आमदारांच्या सहकार्याने सुरू असलेल्या शिबिरात दुसऱ्या दिवशी 150 पेशंटची तपासणी
प्रतिनिधी अमळनेर आमदारांच्या सहकार्याने सुरू असलेल्या शिबिरात दुसऱ्या दिवशी 150 पेशंटची तपासणी करण्यात आली असून रुग्णांची संख्या वाढत असून दोन दिवसांत कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असून त्यावर निर्बंध घालता यावा यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या सहकार्याने शहरातील सर्व एम डी डॉक्टर्स यांच्या मदतीने सुरू असलेल्या शिबिरात दुसऱ्या दिवशी 150 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात सर्दी ,ताप रुग्णांना विषाणूंचा इतरत्र संसर्ग न होता लवकर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
बाहेरून आलेल्या व स्थानिक बालरोग तज्ञ डॉ नितीन पाटील, डॉ संदीप जोशी, डॉ विनोद पाटील, डॉ शरद बाविस्कर ,डॉ प्रशांत शिंदे डॉ राजेंद्र शेलकर आदींनी रुग्णांची तपासणी केली. येथे तपासणी मोफत करण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व खाजगी व खाजगी दवाखान्यातील सर्व डॉक्टरांनी सर्दी ताप खोकल्याचे सर्व रुग्ण याठिकाणी पाठवावेत जेणेकरून कोरोना आहे किंवा नाही याची खात्री होईल व सर्व तालुक्यातील रुग्णांची एका ठिकाणी माहिती जमा होईल.
संशयित रुग्ण सापडल्यास भविष्यातील कोरोनाला अटकाव करता येईल. शनिवारी यावेळी तपासलेल्या रुग्णात 90 मोठे नागरिक व 60 बालकांची अशा 150 जणांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत 225 रुग्ण दोन दिवसात तपासले गेले आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - तालुक्यातील जामनेपाणी गावाच्या अतिदुर्गम वनक्षेत्रात अज्ञात व्यक्तींनी उभारलेल्या अवैध गांजा शेतीचा भंडाफोड करत पोलिसांन...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर वकील संघाच्या निवडणुकीत अँड. प्रल्हाद महाजन यांनी अक्षरशः झंझावाती कामगिरी करत प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. नि...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा