Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ मार्च, २०२०

आरंभ बहुद्देशीय संस्थेचा आधार


कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. यादरम्यान नळदुर्ग शहरात काही वेडसर तर काही वाटसरू असलेले लोक शहरात विविध ठिकाणी दिसून येत आहेत बाजारपेठ, हॉटेल चालू असल्यावर त्यांना खाण्यापिण्याची सोय होत असते पण सध्याच्या परिस्थितीत त्यांची उपासमार होत असताना दिसून येत आहे 

आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अशा लोकांना शोधून त्यांना भाजी, भाकरी, पाणी, फळे देण्यात आले. दिलेले अन्न खाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील भूक मिटल्याचे भाव पाहून निश्चितच मनाला समाधान मिळाले.

संस्थेच्या वतीने नळदुर्ग शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की असे काही लोक निदर्शनास आल्यास त्यांना एकवेळचे अन्न खायला द्यावे अथवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत कळवावे  त्या वेळी डॉ आनंद काटकर ,संस्थेचे उपाध्यक्ष विशाल डुकरे ,सचिव श्रमिक पोतदार सदस्य, डॉ सुजय बिश्वास, मयुर महाबोले आदि उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध