Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २९ मार्च, २०२०

बुलडाणा जिल्ह्यातील 21 विद्यार्थ्यांना येथील प्रशासनाने परत पाठवले नाही. त्यामुळे हे विद्यार्थी सध्या तेथे अडकून पडले आहेत तर हिमाचल प्रदेश येथीलच राजकोट येथील नवोदय विद्यालयातील ८ विद्यार्थी बुलडाणा जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात शिकत असल्याने त्यांना येथील विद्यालय प्रशासनाने राजकोट येथे सोडून दिले. मात्र सोबत गेलेले तीन शिक्षकही तेथेच अडकले आहे.


प्रतिनिधी:बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील चिंचोली गावात असलेल्या एकमेव जवाहर नवोदय विद्यालयातील नवव्या वर्गात शिकणाऱ्या 21 विद्यार्थी हिमाचल प्रदेश राज्यातील चेंबा येथे असलेल्या जवाहर नवोदय नवोदय विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी गेले होते 31 मार्च रोजी त्यांचा शैक्षणिक कार्यकाळ संपणार होता. 

मात्र त्यापूर्वीच देशभरात लॉकडाऊन ची स्थिती निर्माण झाल्याने तेथील विद्यालयातील सर्व विद्यार्थी आपल्या घरी पाठविले गेले मात्र बुलडाणा जिल्ह्यातील 21 विद्यार्थ्यांना येथील प्रशासनाने परत पाठवले नाही. त्यामुळे हे विद्यार्थी सध्या तेथे अडकून पडले आहेत तर हिमाचल प्रदेश येथीलच राजकोट येथील नवोदय विद्यालयातील ८ विद्यार्थी बुलडाणा जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात शिकत असल्याने त्यांना येथील विद्यालय प्रशासनाने राजकोट येथे सोडून दिले. मात्र सोबत गेलेले तीन शिक्षकही तेथेच अडकले आहे.

सध्या शिक्षक आणि विद्यार्थी सुखरूप आहेत. मात्र त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहे. या विद्यार्थ्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरु झाले असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र कसरे यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध