Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २९ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
शल्यचिकित्सकांच्या होमटाऊन मध्ये काही खासगी डॉक्टरांनी केली सेवा बंद कारवाई होणार का ?
शल्यचिकित्सकांच्या होमटाऊन मध्ये काही खासगी डॉक्टरांनी केली सेवा बंद कारवाई होणार का ?
खासगी दवाखाने बंद असल्याने रुग्णांची हेळसांड
शेगांव(उमेश राजगुरे) : कोरोना या संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून शर्यतीचे प्रयत्न सुरू आहेत .अशा पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शहरांमधील खाजगी डॉक्टरांनी स्वतःच्या संरक्षणासाठी दवाखाने बंद केले आहेत, त्यामुळे इतर आजाराची लागण झालेल्या रुग्णांचे उपचाराअभावी हेळसांड सुरू आहे. यामध्ये लहान बालकांना सर्दी, ताप असे किरकोळ आजार जडल्याने आणि खाजगी दवाखान्यात उपचार होत नसल्याने पालकवर्गातून चिंता व्यक्त होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यात कोरोना विषाणू विरुद्ध लढा देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित हे यथोचित प्रयत्न करीत असताना दिसत आहेत. यासाठी आरोग्य प्रशासनासह जिल्हाभरातील खाजगी डॉक्टरही ही मदत करीत आहेत मात्र अशा वेळेसच जिल्हा शल्यचिकित्सक यांचे होमटाऊन असलेल्या संतनगरी शेगावातील काही खाजगी डॉक्टरांनी आपली सेवा बंद केल्याचे दिसून येत आहे. मागील तीन दिवसांपासून शहरातील काही खाजगी डॉक्टर, सोनोग्राफी केंद्र आणि पॅथॉलॉजी लॅब यांनी आपली सेवा बंद केली आहे, या ना त्या कारणाने बंद करण्यात आलेल्या डॉक्टर सेवे मुळे शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे..
एका सोनोग्राफी केंद्राच्या संचालकांनी तर आपल्या केंद्रासमोर फलक लावून केंद्र बंद असल्याचे नमूद केले आहे. तर दुसरीकडे एका एमडी पॅथॉलॉजिस्ट ने मागील तीन दिवसांपासून लॅब बंद करून ठेवल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सेवा बंद करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केल्या जाईल असा इशारा प्रशासनाने दिल्यानंतरही याचा कुठलाही परिणाम शेगावात झालेला दिसून येत नाही.
इतर काळांमध्ये या केंद्रांवर दिवसभर गर्दी असते मात्र ज्या वेळेस राष्ट्रीय आपत्ती घोषित झाली अशा वेळेस डॉक्टर आणि पॅथॉलॉजिस्ट आपली सेवा बंद केल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई होणे अपेक्षित आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा