Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३१ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
धडगाव वडफळ्या(सतिषनगर येथील रहिवाश्यांकडून गरजूंना व अत्यावश्यक सेवा देण्याऱ्यांना अन्नदान!
धडगाव वडफळ्या(सतिषनगर येथील रहिवाश्यांकडून गरजूंना व अत्यावश्यक सेवा देण्याऱ्यांना अन्नदान!
धडगाव:प्रतिनिधी:कोरोना महामारी संदर्भातील संकट लक्षात घेत आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी देशात 21 दिवसाच्या कर्फ्युचे आवाहन केलेआहे.
त्याची दखल घेत पोलीस प्रशासन,आरोग्य प्रशासन,सफाई कामगार,मेडिकल सारखे अत्यावश्यक सेवा बजावणारे सेवेकरी आपल्या कर्तव्यावर कर्तव्यतत्पर राहून सेवा बजावत आहेत त्याशिवाय कर्फ्युमुळे अनेक मजदूर,कष्टकरी लोकांचे रोजगारही बुडून त्यांचा परिवारांची बेअवस्था झालेली दिसून येत आहे तसेच खेड्यापाड्यावरून आलेले पेशन्ट, व जनता यांच्यासाठी व गरजू कुटुंबांना सतीषनगर (वडफळ्या)येथील रहिवाश्यांनी प्रत्येक घरातून 15 ते 20 पोळ्या/भाकर तसेच मसाले भात, बेसन,खुडा,लोणचे,बनवून गरजूंना सहकार्याच्या भावनेने अन्नदान केले
या वेळी सतीष नगर (वडफळ्या) येथील रहिवाशांसह रविद्र तावडे,सोमनाथ गुरव,अशोक बोरदे,हरीनाना खेडकर(आचारी),बापू सूर्यवंशी,आंबालाल मोरे,संजय मोरे,गोकुळ ढोले,दिपक निकवाडे,रघुनाथ पावरा,डोंगर तावडे,महेंद्र मेटकर,दयाराम ढोले,पंकज सूर्यवंशी,भूषण मोरे,पवन मोरे व राज्य युवा परीषद (महाराष्ट्र)अक्राणीचे तालुका समन्वयक जितेंद्र दिलीप ढोले यांनी सहकार्य केले .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा