Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

पुनमचंद मोरे यांची महाराष्ट्र भोई समाज प्रदेश उपाधक्षपदी निवड


 
  
शिरपूर प्रतिनिधी:भोई समाज सेना संस्थापक अध्यक्ष भिलेश खेडकर व प्रदेश अध्यक्ष रोहित शिंगाने यांच्या आदेशान्वये शिरपुर तासुक्यातील सुभाषनगर (वाघाडी) येथील पुनमचंद आनंदा मोरे यांची महाराष्ट्र भोई समाज प्रदेश उपाअध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.  

यासंतर्भात मोरे यांना नियुक्ती पत्रही देण्यात आले आहे.  पुनमचंद मोरे युवा नेतृत्व असल्यामुळे व समाज सेवेच्या कामातील त्यांचा झपाटलेपणा दिसुन आल्यामुळे सर्व भोई समाज बांधवांनी त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून सर्व भोई समाज बांधवांच्या साक्षीने महाराष्ट्र भोई समाज प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली.   

त्यांच्या या निवडीबद्दल समस्त भोई समाज युवा वर्गात उत्साह दिसून येत आहे व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध